Bhool Bhulaiyaa 3 रुह बाबा आणि मंजुलिका यांच्यातील लढत कोणत्या ओटीटीवर दिसणार ?
१७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘भूल भुलैय्या’ने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड सुरू केला. अक्षय कुमार स्टारर चित्रपटात प्रमुख भूमिकेत अक्षय कुमारसोबतच विद्या बालनही आहे. अक्षयने चित्रपटामध्ये, एका डॉक्टराची भूमिका तर विद्याने मंजुलिकाची भूमिका साकारली. दोघांच्याही अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली. १५ वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये, ‘भूल भुलैय्या २’ आला. पण मंजुलिका चित्रपटातून गायब झाली, शिवाय अक्षय कुमारही. कार्तिकच्या या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले.
पण कुठेतरी प्रेक्षकांचे डोळे विद्या बालनसोबत मंजुलिकाला पाहण्यासाठी तळमळत होते. शेवटी, निर्माते भूषण कुमार यांनी प्रेक्षकांची ‘मन की बात’ ऐकली आणि त्यांनी विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितलाही आणले. कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘भूल भुलैय्या ३’च्या कथानकाबद्दल बोलूया…
‘भूल भुलैय्या ३’ ‘भूल भुलैय्या’ आणि ‘भूल भुलैय्या २’पेक्षा जास्त भीतीदायक आहे. ‘भूल भुलैय्या ३’ चे कथानक खुर्चीला खिळवून ठेवणारे आहे. चित्रपटाचं कथानक पुर्वीच्या पश्चिम बंगालमधील रक्तघाट नावाच्या एका राज्यात सुरू होते. त्यावेळी तिथे एका राजाची सत्ता होती. २०० वर्षांपूर्वीचीही कथा आहे. रूह बाबा (कार्तिक आर्यन) आणि त्याचा मित्र गावातील लोकांना भूतांपासून मुक्त होण्याच्या नावाखाली फसवण्याचे काम करतो. तो मीराला (तृप्ती डिमरी) भेटतो. मीरा रुह बाबाला कोट्यवधी रूपयांचे आमिष दाखवून रक्तघाटावर घेऊन जाते. गावात आल्यानंतर रूह बाबाला कळते की स्वतःला राजकुमारी म्हणवणारी मीरा त्याला एक कोटी रुपये तर सोडा, साधे दहा हजार रुपये सुद्धा देऊ शकत नाही.
जेव्हा रूह बाबा राजवाड्यात पोहोचतो, तेव्हा त्याला मीराबद्दल अनेक रहस्ये कळतात. शिवाय मीराचा महत्वाचा उद्देशही रूहबाबाला समजतो. पैशांचं खोटं अमिष दाखवून रूहबाबाला आणण्याचा उद्देश म्हणजे, मंजुलिकाला संपवणे हा आहे. कारण आतापर्यंत मंजुलिकाला भैरव कवचची सुरक्षा होती. पण आता तिला मारायचे आहे. आता खरी मंजुलिका कोण हा प्रश्न आहे. विद्या बालन, माधुरी दीक्षित की आणखी कोणी? आता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट पाहावा लागेल. भूल भुलैयाने प्रेक्षकांना एक खास संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे, प्रेक्षक चित्रपटाच्या शेवटी भूताचा तिरस्कार करत नाही, तर त्याच्या प्रेमात पडतात. त्यांच्या भावनांशी तुम्ही नक्की जोडले जाल. संपूर्ण चित्रपटात मंजुलिका प्रेक्षकांना खूप घाबरवते, पण ती खलनायकाची भूमिका साकारत नाही. ‘भूल भुलैया 3’ चा संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल.
हे देखील वाचा – ‘या’ साऊथ अभिनेत्रीच्या जीवनावर बनणार डॉक्युमेंट्री, लवकरच होणार ओटीटीवर प्रदर्शित!
कार्तिक आर्यनने चित्रपटात स्वत:ला केवळ कॉमेडी आणि रोमान्स पुरते मर्यादित ठेवले नाही. तो त्याच्या व्यक्तिरेखेवर प्रयोग करत असतो, काहीतरी नवीन करण्याची हिंमत दाखवतो, हे तुम्ही नक्कीच चित्रपट पाहिल्यावर म्हणाल. विद्या बालन नेहमीप्रमाणेच अप्रतिम दिसते, तिला मंजुलिकाच्या भूमिकेत पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. विद्याचा अभिनय, व्हॉईस मॉड्युलेशन, बॉडी लँग्वेज आणि सर्वकाही एकदम ओके आहे. माधुरी दीक्षित पहिल्यांदाच एक हॉरर कॅरेक्टर साकारत आहे, तिने तिच्या डोळ्यांतून ज्या प्रकारे एक्सप्रेशन दिले आहेत ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण तृप्ती डिमरी या ताऱ्यांच्या झगमगाटात कुठेतरी हरवून गेली, तिच्यापेक्षा सहाय्यक कलाकारांनी प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन केले आहे.