(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर बनवल्या जाणाऱ्या डॉक्युमेंट्रीबाबत एक अपडेट समोर आले आहे. अभिनेत्याच्या जीवनावर आधारित निर्माते लवकरच एक नवीकोरी डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचा प्रीमियर 18 नोव्हेंबर रोजी Netflix वर होणार आहे. याचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे ज्यामध्ये नयनतारा एका सुंदर ब्लॅक गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उभी असलेले दिसत आहे. ही बातमी ऐकून अभिनेत्रीच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाले आहे.
अभिनेत्री नयनताराच्या जीवनावर बनणार डॉक्युमेंट्री
निर्मात्यानी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये “प्रत्येक विश्वातील, तो सर्वात तेजस्वी तारा आहे.” या माध्यमातून अभिनेत्रीच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला जाणार आहे हे स्पष्ट समजून येत आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनताराच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करण्यात येणार आहेत. यामध्ये तिचे लग्न, चित्रपट निर्माते विघ्नेश शिवनसोबतची तिची भेट आणि त्यानंतर तिची पुढील प्रेमकथा सांगितली जाणार आहे. अभिनेत्रीने स्टारडम कसे मिळवले याची एक कथा देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – Singham Again: चुलबुल पांडेच्या एंट्रीवर चित्रपटगृहात टाळ्यांचा वर्षाव, चाहते म्हणाले ‘हा एक चमत्कार…’
जुळ्या मुलांची आई आहे नयनतारा
नयनतारा आणि विघ्नेश यांचे २०२२ मध्ये लग्न झाले होते. हे एक अतिशय भव्य लग्न होते आणि आता ते क्षण तुम्ही पुन्हा घरी बसून पाहू शकता. याची जबाबदारी नेटफ्लिक्सने घेतली आहे. या माहितीपटात अभिनेत्री सरोगसीच्या माध्यमातून आई होणारी अभिनेत्री आणि त्यासंबंधीचा वादही दाखवण्यात आला आहे. नयनताराने सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. आणि त्यानंतर पती पत्नी आंनदाने आपले आयुष्य जगू लागले हे देखील चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
शाहरुखसोबत अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
याआधी जिओ सिनेमावर अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाचा डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाला होता. आता यानंतर नयनताराने 2003 मध्ये मल्याळम चित्रपट मानसीनाक्करे या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2023 मध्ये अभिनेत्रीने शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आणि तिचा अभिनयही चाहत्यांना खूप आवडला होता. आणि आता या अभिनेत्रीचा माहितीपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हे देखील वाचा – प्रियंका चोप्राने पती निक जोनाससोबत परदेशात साजरी केली दिवाळी, लाल साडीत ‘सुतळी बॉम्ब’ दिसली देसी गर्ल!
कर्नाटकातील बंगलोर येथे जन्मलेल्या नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. ख्रिश्चन कुटुंबात तिचा जन्म झाल्यामुळे ती ख्रिश्चन धर्माची आहे. पण विघ्नेशसोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले जाते. तसेच, नयनताराला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. ती मॉडेल म्हणून काम करत होती जेव्हा दिग्दर्शक अंतिककडने तिच्यावर नजर टाकली. यानंतर डायना नयनतारा म्हणून फिल्मी दुनियेत आली. आपले आपल्या नावाचा गर्जा इंडस्ट्रीमध्ये निर्माण केला.