
फोटो सौजन्य - JioHotstar Reality
बिग बॉस १९ मध्ये सुरू असलेल्या फॅमिली वीक दरम्यान, कुनिका, अशनूर, गौरव आणि फरहानाच्या घरातील कुटुंबीय आधीच पोहोचले आहेत. प्रेक्षकांसाठी, त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पाहणे ही एक मेजवानी होती. गौरवची पत्नी आकांक्षा गेल्यानंतर, अमालचे कुटुंब आता आले आहे. अमाल मलिकचे वडिल शोमध्ये फॅमिलि विकमध्ये येणार असे म्हटले जात होते पण आता त्याला शोच्या कालच्या नव्या भागामध्ये बाॅलिवूडचा सिंगर आणि अमालचा भाऊ अरमान मलिक घरामध्ये त्याच्या भावाच्या सपोर्टसाठी आला होता. दोन्ही भावांमधील प्रेमाने घरातील सदस्यांनाही अश्रू अनावर झाले.
या शोचा एक नवीन भागामध्ये समोर आले आहे, ज्यामध्ये अरमान घरात गाणे गाताना प्रवेश करतो आणि स्विमिंग पूलजवळ फ्रीजरमध्ये बसलेल्या त्याच्या भावाला मिठी मारतो. त्याच्या भावाला पाहून अमलला त्याचे अश्रू आवरता येत नाहीत. त्यांचे प्रेम पाहून फरहाना भट्ट देखील भावूक झाली. सोशल मीडियावर भावांच्या पुनर्मिलनाचे कौतुक केले जात आहे. अरमानने अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी गाणी गायली आहेत. म्हणूनच, तो त्याचे स्टारडम मागे सोडून त्याच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी टीव्ही शोमध्ये आला आहे.
Dekhiye brotherhood ka kamaal, Armaan ko dekh apne aansu nahi rok paaye Amaal. 🫶🏻🥹 Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par. Watch Now:- https://t.co/XNlwzrDIIH pic.twitter.com/mWLiiKBBaj — JioHotstar Reality (@HotstarReality) November 19, 2025
यामध्ये शोमध्ये अमालने अरमानला पाहिल्यानंतर त्याचे अश्रू थांबले नाही. बिग बॉस १९ चा शेवट फक्त तीन आठवडे दूर आहे. स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी फॅमिली वीक सुरू आहे. आतापर्यंत कुनिकाचा मुलगा अयान, अशनूरचे वडील गुरमीत, गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा आणि फरहाना भट्टची आई यांनी प्रवेश केला आहे. आजच्या भागात अमालचा भाऊ अरमान दिसणार आहे. येत्या काही दिवसांत शाहबाजचे वडील, मालतीचे वडील आणि तान्या मित्तलचा भाऊ दिसू शकतात.
प्रणीतच्या भावाची विनोदबुद्धी अगदी प्रणीतसारखीच झाली. प्रणीतचा भाऊ आणि अमलचा भाऊ अरमानच्या आगमनाने वातावरण उजळून निघाले. सोशल मीडियावर आणखी एक प्रोमो व्हायरल होत आहे. दरम्यान, बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी आगीची व्यवस्था केली. अरमान मलिकने एक खास परफॉर्मन्स दिला आणि सर्व घरातील सदस्यांसाठी त्याच्या गाण्यांची जादू पसरवली. अरमान मलिकची ही शैली सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.