'कुत्रे पाठीमागूनच भुंकतात...', स्टेजवर गाणं गाताना प्रेक्षकांमधून अश्लील इशारे येताच प्रसिद्ध गायिका संतापली
गायकांवर कॉन्सर्टवेळी चप्पल फेकणे, बाटल्या भिरकवणे किंवा अश्लील कृत्य करणे असे अनेक प्रकार भर कॉन्सर्टदरम्यान झालेले आहेत. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. आता अशातच ही घटना पुन्हा एकदा घडलीये. त्याचं झालं असं की, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंह हिंदु नववर्षाच्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अभिनेत्री सहभागी झाली होती. ह्या कार्यक्रमाचे आयोजन बिहारच्या आरा जिल्ह्यातील एका गावात करण्यात आले होते. तिथल्या एका इव्हेंटदरम्यान अश्लील इशारे आणि हावभाव करणाऱ्याला अभिनेत्रीने चांगलंच सुनावले आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज
हिंदु नववर्षानिमित्त बिहारच्या आरा जिल्ह्यातील बखोरापूर गावामध्ये प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंहच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमा दरम्यान, अभिनेत्रीने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अश्लील इशारे आणि हावभाव करणाऱ्या एका व्यक्तीला चांगलेच सुनावले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भर कार्यक्रमामध्ये अभिनेत्रीने विचित्र चाळे करणाऱ्याला शिवीगाळही केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अक्षराच्या एका फॅनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. तिच्या चाहतीने हा व्हिडिओ शेअर करताच तुफान व्हायरल होत आहे.
अक्षराने हिंदु नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री स्टेजवर गाणं गात असताना, तिच्याकडे पाहून प्रेक्षकांमधील काहींनी अश्लील हावभाव केले होते. ते पाहून अभिनेत्री चांगलीच संतापली. तिने परफॉर्मन्स थांबबून त्यांची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळाले. “काही लोकांच्या अंगात किडे आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते तुमच्यात एवढाच दम असेल तर समोर या. अक्षरा सिंहला हलक्यात घेऊ नका. मला शेरनी उगाच बोलत नाहीत. इकडे या, माझ्यासमोर…पाठीमागून तर कुत्रे भुंकून निघून जातात. आणि हो तुमची तुलना मी कुत्र्यांशीच करणार”, असं अक्षरा या व्हिडिओत म्हणत आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
‘घिबली’ ट्रेंडला प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा विरोध; म्हणाला, “फोटो बनवू नयेत आणि…”
अभिनेत्रीसोबत कार्यक्रमादरम्यान अश्लील कृत्य करणाऱ्यावर तिने अशा पद्धतीने कानउघडणी केली. दरम्यान, पवन सिंह यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला अक्षरा सिंहने हजेरी लावली होती. जेव्हा ती स्टेजवर आली आणि गाणं म्हणू लागली, तेव्हा तिथे जमलेल्या चाहत्यांनी मोठ्या संख्येनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यातील एक व्यक्ती मागून अश्लील हावभाव करू लागला. ज्यावर अक्षरा सिंह संतापली. तिनं सर्वांसमोर स्टेजवरून अपशब्द वापरायला सुरुवात केली. या कार्यक्रमाला भाजपा नेते अजय सिंह यांच्यासह भोजपूरी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते.