जान्हवीची दादागिरी बंद होणार, रितेश भाऊ तिला बाहेरचा रस्ता दाखवणार?
Bigg Boss Marathi चा ५ वा सीझन कमालीचा जोमात आला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात जोरदार राडा आपण झालेला पहिला. जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ कांबळे मध्ये झालेल्या वादाची सध्या ‘बिग बॉस’च्या चावडीवर चर्चा सुरू आहे.
‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये निक्की पॅडीला ‘जोकर’ म्हणाली होती. टास्क संपल्यानंतर जान्हवी पॅडीला त्याच्या अभिनायावरून हिणवलं होतं. जान्हवीला तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर फक्त चाहत्यांचीच नाही तर अनेक मराठी सेलिब्रिटींच्याही विरोधाची आणि संतापाची लाट सहन करावी लागली आहे. त्या विधानानंतर तिने पंढरीनाथ कांबळेची माफीही मागितली.
दरम्यान, जान्हवीला त्या विधानानंतर काल झालेल्या ‘भाऊचा धक्का’मध्ये संतापलेल्या रितेशने जान्हवीला ‘भाऊच्या धक्का’वर बसायचं नाही. आतापासून तुमची जागा बाहेर असं म्हणत रितेशने जान्हवीला काल तुरूंगामध्ये टाकलं. तिला पुढच्या आठवड्याभर घरातील गार्डन परिसरात उभारण्यात आलेल्या जेलमध्ये राहावं लागणार आहे. तिला चांगलीच शिक्षा दिल्यामुळे अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी याबद्दल रितेशचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री सुरेखा कुडची यांची रितेश देशमुखसाठीची पोस्ट
“लव्ह यू रितेश भाऊ… आज शांतपणे झोप लागेल… भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत… प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्या… त्याबद्दल धन्यवाद… याचीच वाट पाहत होतो… घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण, जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं… तुम्ही जेव्हा म्हणालात की, अरबाज– निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही. ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर लई भारी “मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं…” ‘ए’ टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं… आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलंत… बाकी ‘बी’ टीमची तारीफ करावी असंच ते खेळले आहेत… असा ‘भाऊचा धक्का’ पाहायला नक्की आवडेल… love you ritesh bhau”
रितेशने जान्हवीला दिलेली ही शिक्षा किती दिवसांसाठी असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाचव्या आठवड्यात होणाऱ्या टास्कमध्ये जान्हवीला सहभागी होता येणार का ? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. इरिना रुडाकोव्हा, अभिजीत सावंत, आर्या जाधव आणि वैभव चव्हाण या नॉमिनेटेड सदस्यांपैकी घराबाहेर कोण जाणार हे आजच्या एपिसोडमध्ये कळेल.
हे देखील वाचा – कान्हाज मॅजिकचा ऑडिशन अलर्ट; मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी