फोटो सौजन्य - Social Media
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि त्यांच्या पत्नी मंजिरी भावे यांची निर्मिती संस्था कान्हाज मॅजिकने नवं कलाकारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये पहिले पाऊल ठेवण्याची संधी कान्हाज मॅजिकने आणली आहे. या प्रॉडक्शनच्या माध्यमातून मराठी मालिका निर्माण केले जातात. एकंदरीत, भावे जोडप्याची ही निर्मिती संस्था मराठी भाषेत मालिका बनवण्यावर जास्त लक्ष देते. मराठी मालिकांद्वारे मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणे तसेच त्यांना खळखळून हसवणे या संस्थेचे मुख्य उद्देश आहेत. नुकतेच, कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. याच्या माध्यमातून नवं कलाकारांसाठी मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी दार खोलले आहे. या पोस्टमध्ये ऑडिशन आयोजित केल्याविषयी बाबी मांडण्यात आल्या आहेत.
कान्हाज मॅजिकने रविवारी हे ऑडिशन अलर्ट पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेच्या अधिकृत इंस्टग्राम हॅन्डलने अभिनेते सुबोध भावे यांच्या पत्नी मंजिरी भावेंसोबत कोलॅबोरेट केले आहे. त्यामुळे ऑडिशनची ही जाहिरात खात्रीशीर असून, लवकरच मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. या पोस्टमध्ये काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. या पोस्टरवर मराठी टेलिव्हिजन सीरिअल असे नाव नमूद असून. ठळक अक्षरात ‘ऑडिशन अलर्ट’ लिहिले गेले आहे.
महत्वाचे म्हणजे ऑडिशन २६ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार असून कलाकारांना सकाळी ११ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान उपस्थित राहावे लागणार आहे. या ऑडिशनमध्ये कलाकरांना वयोमर्यादा दिल्या आहेत. एकंदरीत, ऑडिशन हे मुलं तसेच मुली दोघांसाठी आयोजित केले गेले असून २० वर्षांपासून ते ३२ वय असलेल्या कलाकारांनाच ऑडिशन देता येणार आहे. या ऑडिशनमध्ये भाग घेण्यासाठी कलाकारांनी “केशव गोरे सम्राट ट्रस्ट, आरे रोड, आंबा माता मंदिराच्या मागे, पिरामलनगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई – ४०००६२” या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. त्याचबरोबर इच्छुक कलाकारांसाठी पोस्टरमध्ये संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, कान्हाज मॅजिकने या ऑडिशन प्रक्रियेत मोठ्या संख्येने मराठी कलाकार उपस्थित राहतील आणि आपल्या कलेने मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या स्वप्नांना चालना देतील अशी आशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, इच्छुक कलाकारांनी ऑडिशन मध्ये नक्कीच सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले आहे.