Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्रीचं अस्सल मराठी ठसकेबाज नवं गाणं ऐकलंत का ? गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

मराठमोळा पेहराव, मराठी सण, मराठी भाषा या सगळ्यांची झलक आता एकाच दमदार मराठमोळ्या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. गीतकार- संगीतकार प्रशांत नाकती याचं 'मराठी ठेका' गाणं चाहत्यांना ठेका धरायला लावतंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 08, 2025 | 09:32 PM
'बिग बॉस मराठी ५' फेम अभिनेत्रीचं अस्सल मराठी ठसकेबाज नवं गाणं ऐकलंत का ? गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

'बिग बॉस मराठी ५' फेम अभिनेत्रीचं अस्सल मराठी ठसकेबाज नवं गाणं ऐकलंत का ? गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये नांदते मराठी,
कोकणातला गोडवा माझी ही मराठी…
विदर्भाची, दक्खनची शान ही मराठी,
दिल्लीचेही तख्त राखिते माय मराठी…

गाण्यातील या ओळींनी प्रत्येक मराठी माणसाला स्फूर्ती मिळत आहे. महाराष्ट्रातील आपली नाती-गोती, सणवार जपत आपल्या मराठी मायभूमीवर साऱ्या मराठी बांधवांना बांधून ठेवलं आहे. मराठी असल्याचा गर्व उराशी ठेवून आज प्रत्येक मराठी माणूस अगदी ताठ मानेने वावरत आहे. आपल्या मराठी भाषेचे करावे तितके कौतुक कमीच. मराठी माणसं, त्यांचा मराठमोळा देश, मराठमोळा पेहराव, मराठी सण, मराठी भाषा या सगळ्यांची झलक आता एकाच दमदार अशा मराठमोळ्या गाण्यातून पाहायला मिळणार आहे.

शिक्षणासह समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख समोर

सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार प्रशांत नाकती यांच्या संकल्पनेतून भेटीस आलेलं हे ‘मराठी ठेका’ गाणं साऱ्या मराठ्यांना ठेका धरायला लावतंय. मराठी संगीताची पारंपरिक ढवळी, हलगी आणि लयबद्ध ठेका या गाण्यात नव्या दमाच्या उर्जेसह अनुभवायला मिळतोय. या मराठमोळ्या गाण्यातून आपणा सर्वा मराठी माणसांना मराठी किती महत्त्वाची आहे, मराठी आपला प्राण आहे, याला विसरून चालायचं नाही याची आठवण करुन दिली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गाण्याचे चित्रीकरण थेट महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी या गावात करण्यात आले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी शूट केलेल्या दृश्यांनी गाण्याला एक भव्य आणि सुरेख पार्श्वभूमी दिली आहे.

फक्त मनोरंजन नव्हे, तर मराठी संस्कृतीचा ठसा जगभर उमटवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न मराठी ठेका या गाण्यातून करण्यात आला आहे. प्रशांत नाकती म्युझिकलच्या या मराठी गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित जाधव याने केले असून नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी कोरियोग्राफर अर्चित वारवाडे याने सांभाळली आहे. तर गाण्याचे छायाचित्रण सूरज राजपूत यांनी केले आहे. या गाण्यात निक शिंदे, विशाल फाले, आयुष संजीव, भरत मदान, अपूर्वा पाटील, तश्वी भोईर या कलाकारांनी मनं जिंकली आणि विशेष आकर्षण ठरलेली परदेशी अभिनेत्री इरिना रुडाकोवाने प्रत्येकाच्या मनात घर केलं. गायनाची बाजू देखील तितकीच भक्कम असून, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या दमदार आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेबद्दल मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातली खदखद, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

गाण्याला प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांचं संगीत लाभलं असून, यात पारंपरिक वाद्यांची आधुनिक मिश्रणातून एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. इरिनाची एन्ट्रीवर ‘मराठी ठेका’ या मराठमोळ्या गाण्याची जोड साऱ्या महाराष्ट्राची नव्याने ओळख करुन देतेय. परदेशातून आलेल्या पाहुणीला महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक आणि संगीताचा ठेका या गाण्याद्वारे दाखवण्यात आला आहे. अल्पावधीतच या गाण्याने हजारो व्ह्यूज, लाईक्सचा टप्पा पार केला आहे. प्रशांत नाकतीच्या याआधीच्या गाण्यांचीही सोशल मीडियावर हवा पाहायला मिळाली. ‘नौलखा हार’, ‘नखरेवाली’, ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘बाप्पा नादखुळा’ या गाण्यांनी आजवर मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. आणि यानंतर आता प्रत्येक मराठी माणसाच्या दिलाचा ठेका चुकवायला ‘मराठी ठेका’ हे गाणं सज्ज झालं आहे.

Web Title: Bigg boss marathi 5 actress irina rudakova aayush sanjeev vishal phale nick shinde starrer marathi thekaa song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:32 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद
1

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना
2

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
4

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.