nibar marathi movie trailer released on social media
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनवत जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा वसा जोपासत समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेला ‘निबार’ हा आगामी मराठी चित्रपटही याच वाटेने जाणारा आहे. शिक्षणासह समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. १३ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेबद्दल मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातली खदखद, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
निर्माते संतोष भणगे, अनिकेत माळी आणि भरत सावंत यांनी ध्रुव फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली ‘निबार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. जितेंद्र भास्कर ठाकरे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सुनील शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘निबार’च्या पोस्टरवरील मराठी चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलाकारांचे चेहरे पाहता क्षणीच लक्ष वेधून घेतात. गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्याच्या सोबतीला अभिनेत्री सायली संजीव आहे.
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे शशांक शेंडे यांची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याखेरीज देविका दफ्तरदार आणि अरुण नलावडे यांच्याही भूमिका आहेत. पोस्टरवर दिसणाऱ्या या सर्व कलाकारांच्या जोडीला सुर्योदयाच्या पार्श्वभूमीवर पाच लहान मुले चालताना दिसतात. त्यावरून या चित्रपटाची कथा त्यांच्याभोवती फिरणारी असल्याचे जाणवते. शांता तांबे, राजेश दुर्गे आणि अनिकेत माळी यांनीही या चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
‘सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? ‘देवमाणूस-मधला अध्याय’च्या प्रोमोने वेधलं लक्ष
राजेश दुर्गे आणि सुनिल शिंदे यांनी ‘निबार’ची पटकथा व संवादलेखन केले आहे. गीते वैभव देशमुख यांनी लिहिली असून, संगीत व पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे आहे. आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांनी या चित्रपटासाठी गायन केले आहे. छायालेखन धनंजय कुलकर्णी यांनी, तर संकलन सुनिल जाधव यांनी केले आहे. सतिश बिडकर यांनी कला दिग्दर्शन केले असून, साऊंड डिझाईन अभिजीत देव यांनी केले आहे. शिरीष राणे कास्टिंग व लाईन प्रोड्युसर, तर अमोल गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.