जेलमधून बाहेर येताच जान्हवी आणि घनःश्याममध्ये वादाची ठिणगी
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क कालच्या एपिसोडमध्ये पार पडला. घरात ज्यांचा दमदार खेळ नाही, त्या सदस्याचा फोटो फाडून कचरा पेटीत टाकायचा टास्क सर्व घरातल्या सदस्यांना देण्यात आला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कदरम्यान घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. सध्या घरात नाराजीचं वातावरण असताना, अशातच पुन्हा एकदा जान्हवी आणि घन:श्याम यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आहे.
हे देखील वाचा – सनी लिओनी 2024-25 मध्ये पाच पेक्षा जास्त मोठ्या रिलीज साठी सज्ज!
त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. टास्क सुरू होण्यापूर्वीही वैभवमुळे जान्हवी आणि घन:श्याम यांच्यात आधीच कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नॉमिनेशन टास्क दरम्यान कडाक्याचे भांडण झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत आहे, ती म्हणते, “सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. संपूर्ण घराने तुला नॉमिनेट केलं आहे.” तिच्या ह्या वक्तव्यावर घन:श्याम म्हणतो, “मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही”. पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते,”अक्कल शून्य आहेस तू”.
पुढे प्रोमोमध्ये दोघांनीही अक्षरश: एकमेकांची अक्कल काढली आहे. इतक्या कडाक्याचे भांडण सुरू असताना सुद्धा घरात कोणालाही त्यांच्या भांडणाचं काहीही देणं घेणं पाहायला मिळत नाहीये. सध्या सोशल मीडियावर जान्हवीलाही आणि घन:श्यामलाही नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे. अनेकांनी घन:श्याम या आठवड्यात घराबाहेर जाणार, थेट असंच भाकित केलं आहे. तर काहींनी फुटेज खाण्यासाठी जान्हवी इतकी ओरडतेय, अशीही कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर ह्या प्रोमोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
पॅडी दादा घेतायत सूरजची शिकवणी
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तर नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते. त्यामुळे सूरजला पॅडी दादा म्हणत आहेत,”अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस..तू तुझा निर्णय बदलायला नको होतास. अरबाजबद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते. गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं. प्रयत्न करणं सोडू नको”.