'भाऊच्या धक्क्या'वर रितेशने निक्कीची बाजू घेताच विशाखा सुभेदार भडकली
Vishakha Subhedar On Nikki Tamboli : सध्या बिग बॉसच्या खेळात दिवसेंदिवस नवनवीन टास्क आणि खेळ पाहायला मिळत आहे. नुकताच पाचवा ‘भाऊचा धक्का’पार पडला. या आठवड्याच्या धक्क्यावर प्रेक्षकांना रितेश देशमुखचा केव्हाही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळाला. अनेकदा निक्की तांबोळीला झापणाऱ्या रितेशने तिचे काल कौतुक केले. तिच्या कॅप्टन्सीचे कौतुक केले. त्यासोबतच तिच्या गेम स्ट्रेटेजीचेही कौतुक केले. याचा धक्का फक्त प्रेक्षकांनाच नाही तर टीम A ला सुद्धा धक्का बसला आहे.
“संपूर्ण एपिसोडमध्ये निक्कीचेच कौतुक का ?”असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून रितेश देशमुखला विचारला आहे. शिवाय, हाच प्रश्न काही मराठी सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरून विचारला आहे. अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रश्न विचारला आहे. अभिनेत्रीने बिग बॉसच्या अनसीन देख मधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये निक्की आणि अभिषेक वाईल्ड कार्डबद्दल बोलताना दिसत आहेत. याचाच हवाला देत अभिनेत्री विशाख सुभेदारने कालच्या एपिसोडबद्दल एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणते की, “काल निकी सोडून सगळेच चुकले… जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले.. अरबाज ने प्यादं केल उरलेल्या लोकांचं. मान्य चुकलंच! त्याच्यावर (अरबाज + निक्की) तुमचा गेम नकोच असायला.. अरबाज आणि नक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा..! आत्ता धक्का… B team लाच.. आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा… निकीने डबा फोडला.. तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा गेम होता.. मग अभिजीतला त्याक्षणी team b ने सपोर्ट न करण हा त्यांचा गेम असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल… Individual game आणि team स्पीरीटचा game आहे.. ”
“घेतला एकत्र डिसिजन… मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही??? का आणि ऑपशन का दिला गेला?? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त b team ला का धारेवर धरलं जात?? आत्ता जरा निक्की बद्दल… ह्या बाई… निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री. आणि हा ( मी जो post करतेय तो )video पाहिला मी आणि असं वाटलं कीं ही घरून ठरवूनच आलीय, एक handasome bb न घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळाचा ही फायदा घेणार… आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार!”
“अरे हे काय आहे??? किती स्वार्थी असावं..? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजित निमूट ऐकन कसं घेतो.. ही निक्की ची सो called स्ट्रटरर्जी..?? ह्या आधी हे एकमेकांत गुंतण आम्ही पाहिलंय..(पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक. आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन ह्या सीझनमध्येच ऐकला पाहिला. अरबाज वैभव भिडले नाहीत.. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत.. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं.. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही.आणि वैभव पण घाबरतो अरबाज ला…!”