Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; व्हिडिओतून दाखवली पहिली झलक

'बिग बॉस'च्या घरात सूरज ७० दिवस कमालीचा चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सूरजने त्याच्या गावात स्वत:चं घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्याच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरूवात झालीये.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 27, 2024 | 07:26 PM
सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; व्हिडिओतून दाखवली पहिली झलक

सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; व्हिडिओतून दाखवली पहिली झलक

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाणचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. ‘झापुक झुपूक’ अंदाजात या ‘गुलीगत किंग’ने ‘बिग बॉस’ च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरज ७० दिवस कमालीचा चर्चेत राहिला होता. बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर सूरजने त्याच्या गावात स्वत:चं घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. या घराला ‘बिग बॉस’ असं नाव देणार असल्याचंही तो म्हणाला होता.

“अलविदा सरदार !” अभिनेता किरण मानेंची डॉ. मनमोहन सिंहसाठी खान भावनिक पोस्ट चर्चेत

काही तासांपूर्वीच सूरजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूरजच्या घराचं बांधकाम जोरदार पद्धतीने सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सूरजच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूरज स्वत: त्याचं हे नवीन घर बांधताना दिसत आहे. शिवाय, तो स्वत: त्याच्या घराच्या बांधकामाला पाणी देताना दिसत आहे. “माझं घर… लवकरच ‘बिग बॉस’चा बंगला”, असं कॅप्शन सूरजने या व्हिडिओला दिलं आहे. पण आता लवकरच, सूरजच्या स्वत:च्या घराची इच्छा पूर्ण होणार, हे नक्की…

 

बिग बॉसच्या घरामध्ये येण्यापूर्वी सूरज चव्हाणच्या घरची आणि त्याच्या कुटुंबीयांची परिस्थिती फारच हालाखीची होती. सूरज लहान असतानाच त्याच्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं. आई- वडिलांच्या निधनानंतर सूरजचा सांभाळ त्याच्या बहि‍णींनी केला. कोरोनाकाळात टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्राम रिल्समुळे सूरज घराघरांत फेमस झाला. खरंतर, ‘बिग बॉस’मुळेच सूरजच्या करियरला कलाटणी मिळाली आहे. ग्रँड फिनालेच्या वेळी सूरजने गावी जाऊन सर्वात आधी आपलं हक्काचं घर बांधणार आणि त्याला ‘बिग बॉस’चं नाव देणार असा निश्चय केला होता.

All We Imagine As Light : ‘ऑल व्ही इमॅजिन ॲज लाइट’ ओटीटीवर सज्ज, पायल कपाडियाने व्यक्त केला आनंद!

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर कमावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला लवकरात लवकर हक्काचं घर बांधून देण्यात येईल असा शब्द दिला होता. आता त्याच घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे. अजित पवारांनी घोषणा केल्यानंतरच लगेचच सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सूरजने सांगितले की, “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी (अजित पवार यांनी) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” आता सूरजने याची खास झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

YJHD: ‘ये जवानी है दिवानी’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल, निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून जाहीर केली डेट!

सूरजने शेअर केलेल्या ह्या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलेला आहे. लवकरच जिओ सिनेमाच्या बॅनरखाली केदार शिंदेच्या दिग्दर्शनात सूरजच्या आयुष्यावर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेवेळी त्याच्यावर चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली होती. ‘झापुक झुपूक’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 5 winner suraj chavan shared first glimpse of constructing his new house video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • marathi actor
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा
1

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला
2

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
4

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.