Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zapuk Zupuk Teaser: गोलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा अफलातून टीझर रिलीज, स्टाईलने वेधलं लक्ष

'बिग बॉस मराठी' ५ च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलंय. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली असून तो आता पुन्हा एकदा जलवा दाखवायला सज्ज झाला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक"चा धमाकेदार टीझर रिलीज झालाय.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 18, 2025 | 12:16 PM
Zapuk Zupuk Teaser: गोलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा अफलातून टीझर रिलीज, स्टाईलने वेधलं लक्ष

Zapuk Zupuk Teaser: गोलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा अफलातून टीझर रिलीज, स्टाईलने वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी सिझन ५ च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाण ने आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच “झापुक झुपूक” ह्या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसणार आहे आणि आज जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” चा धमाकेदार टिझर प्रदर्शित झालाय.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणखी एक बालनाट्य रंगभूमीवर, ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत

सूरजचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे ज्यात तो ‘म्हणतो मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे’, असाच त्याच्या “झापुक झुपूक” सिनेमाचा टिझर आहे. दमदार आणि गाजवणारा. टिझर मध्ये चित्रपटाची थोडीशी झलक पहायला मिळते, सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल्ल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहे. हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरज ने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे, मराठी मातीतल्या ह्या साध्या भोळ्या सूरज साठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे.

Ashi Hi Jamva Jamvi: वयाचं बंधन कशालाच नसतं, ना मैत्रीला, ना प्रेमाला, ना विनोदाला; ‘अशी ही जमवाजमवी’चा धमाल कॉमेडी टीझर रिलीझ…

सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हल्लीच सूरज ने जेजुरीच्या खंडोबा देवाचे, आईमरी मातेचे आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशन ची जोरदार सुरुवात केली आहे.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित “झापुक झुपूक” हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे !!

Web Title: Bigg boss marathi 5 winner suraj chavan starrer zapuk zupuk marathi movie teaser out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • marathi film
  • suraj chavan

संबंधित बातम्या

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान
1

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान

‘या’ साऊथ सुपरस्टारला मराठी चित्रपटाची भुरळ, ‘गोंधळ’ चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाला ‘हे रत्न…’
2

‘या’ साऊथ सुपरस्टारला मराठी चित्रपटाची भुरळ, ‘गोंधळ’ चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाला ‘हे रत्न…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.