bigg boss marathi season 4
बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) पर्वाची सगळेजण प्रतीक्षा करत आहेत. प्रेक्षकांना आता जास्त वाट बघण्याची गरज नाही. कारण बिग बॉस मराठीचं चौथं पर्व सुरू व्हायला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. ‘बिग बॉस मराठी ४’चं २ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.०० वाजता ग्रँड प्रीमियर (Bigg Boss Marathi 4 Grand Premier) होणार आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो रिलीज झाले आहेत. त्यामुळे चाहते आता आतुरतेने या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षक कलर्स मराठीवर (Colors Marathi) सोम-शुक्र रात्री १० वा. आणि शनि-रवि रात्री ९.३० वा. पाहू शकतात.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. याशिवाय या सीझनची थीम आणि फॉरमॅटदेखील नवीन असणार आहे. तसेच यंदा १०० दिवसांचा खेळामध्ये ‘ऑल इज वेल’ असणार आहे. बिग बॉस मराठीच्या तिन्ही सीझनमध्ये महेश मांजरेकरांनी कार्यक्रमाची लोकप्रियता अधिक वाढवली. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
बिग बॉसच्या घरात यावेळी रोडिज फेम मॉडेल, अभिनेता योगेश जाधव, रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, रोहित शिंदे, नेहा खान, सिद्धार्थ खिरिद, चेतन तीत्रे, प्रसाद जावदे सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.