Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत. तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची चर्चा होती त्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 06, 2025 | 07:34 PM
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची इतके दिवसांपासून चर्चा होती तो ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. महेश मांजरेकर यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत, चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या भव्य चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रभावी टीझरमध्ये त्यांच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसर देखील झळकली आहे.

दिमाखात पार पडला ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ मालिकेचा लाँचिंग सोहळा, समृद्धी केळकरच्या नव्या भूमिकेसाठी चाहते उत्सुक

टीझरमध्ये ऐकू येणारे ‘राजं… राजं’ हे बोल ज्या ऊर्जेने, ज्या भावनांनी भरलेले आहेत, ते थेट काळजाला भिडतात. सिद्धार्थ बोडकेच्या संवादांमधून केवळ इतिहासाची आठवण होत नाही, तर मनात नवी उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा संचारते. शिवरायांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यागमय नेतृत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या टीझरमधील दृश्यं आणि संवाद हे अंगावर शहारे आणणारे आहेत.या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक पुनरावलोकन न होता, आधुनिक काळातील समाजाला भिडणारा विचारप्रवाह पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “शिवाजी महाराज ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून ते एक विचार आहेत. हा विचार आज अधिक आवश्यक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे इतिहासाकडे मागे वळून पाहाणं नाही, तर शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात आजचा अंधार उजळवण्याचा प्रयत्न आहे. समाजात निर्माण झालेल्या निराशा, उदासीनता, आणि दिशाहीनतेच्या गर्तेत आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं गरजेचं आहे. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे..”

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट भूतकाळात रमणारा नाही, तर आजच्या समाजाला जागं करणारा ठरणार आहे. शिवाजी महाराजांचे विचार आणि तत्वं या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सशक्त माध्यमातून साकारलेला प्रयत्न आहे.

हर्षवर्धन राणेने Silaa चित्रपटातील BTS फोटो केले शेअर, कठोर परिश्रम करताना दिसला अभिनेता

Web Title: Direrctor mahesh manjrekar marathi movie punha shivajiraje bhosale first look release on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Film Director
  • mahesh manjrekar
  • marathi movie

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
2

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा
3

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…
4

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.