Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bol Bol Rani Movie : रहस्याच्या दुनियेत प्रेमाची चाहूल; ‘बोल बोल राणी’चं पहिलं गाणं ‘सुपरनोव्हा’ रिलीज

Bol Bol Rani Movie: ‘बोल बोल राणी’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘सुपरनोव्हा’ प्रदर्शित. सई ताम्हणकर आणि सुबोध भावे यांच्या भावनिक केमिस्ट्रीने सजलेलं हे गाणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 02:02 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या आणि प्रयोगशील अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारी सई आता एका नव्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लवकरच सई ताम्हणकरचा बोल बोल राणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बोल बोल राणी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या दमदार ट्रेलरनंतर आता चित्रपटातील पहिलं गाणं ‘सुपरनोव्हा’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रत्येक पात्राभोवती असलेलं गूढ, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची झलक दाखवणाऱ्या ट्रेलरनंतर या गाण्यातून चित्रपटाच्या भावनिक विश्वाची नवी बाजू समोर आली आहे.

सामान्य प्रेमगीतांच्या चौकटीपलीकडे जाणारं ‘सुपरनोव्हा’ हे केवळ ऐकण्यापुरतं नसून अनुभवण्यासारखं गाणं आहे. सुपरनोव्हा म्हणजे ताऱ्याच्या विस्फोटातून निर्माण होणारं अफाट तेज. याच भावनेचा आधार घेत हे गाणं प्रेमाच्या अशा टप्प्याची कथा सांगतं, जिथे भावना इतक्या तीव्र होतात की त्या व्यक्तीच्या आयुष्यालाच नवं वळण देतात.

चित्रपटातील रहस्य उलगडण्याऐवजी हे गाणं त्या रहस्यामागील भावनिक संघर्षाची झलक दाखवतं. सुझेन डिमोला यांच्या भावपूर्ण आवाजाने सजलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलं आहे. तर सावरी वर्मा यांनी लिहिलेल्या शब्दांमध्ये प्रेम, ओढ आणि मनातील अनामिक अस्वस्थतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

गाण्यात अभिनेत्री सई ताम्हणकर एका वेगळ्याच भावविश्वात दिसत असून, तिच्या नजरेतून आणि अभिनयातून अनेक न बोललेल्या भावना व्यक्त होतात. तर सुबोध भावे एखाद्या गुंतागुंतीच्या कोड्याचा शोध घेत असल्याची झलक पाहायला मिळते. त्यामुळे ‘सुपरनोव्हा’ हे केवळ रोमँटिक गाणं न राहता चित्रपटातील रहस्य आणि भावनिक संघर्ष यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरतं.

Akanksha Chamola: गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोला दुसरं लग्न करणार? भविष्यातील योजनांबाबत केला मोठा खुलासा

याबाबत दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, “चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा कथेशी जवळचा संबंध आहे आणि ‘सुपरनोव्हा’ हे त्यातील सर्वात खास गाणं आहे. हे गाणं पात्रांच्या मनात सुरू असलेल्या भावना, त्यांच्या नात्यांमधील बदल आणि भावनांचा खोलवरचा प्रवास दाखवतं.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सांगितलं की, “या गाण्यात पारंपरिक प्रेमगीताचा सूर न ठेवता प्रेमामुळे होणारा अंतर्गत बदल, अस्वस्थता आणि नवी ऊर्जा यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या गाण्यात शांतता, धडधड आणि गूढता अशा तिन्ही भावना आहेत.”

 

ट्रेलरनंतर आता ‘सुपरनोव्हा’ या गाण्यामुळे ‘बोल बोल राणी’च्या रहस्यमय विश्वाला भावस्पर्शी आणि सुरेल आयाम मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव

न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय आणि सिड विंचुरकर आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृपलानी हे सहनिर्माते आहेत.

सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा रहस्य, थरार आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bol bol rani unveils its first song supernova release sai tamhankar and subodh bhaves chemistry steals the spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • latest movies
  • sai tamankar
  • subodh bhave

संबंधित बातम्या

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?
1

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?

Bol Bol Rani Trailer : संवाद, स्टोरी, सई… सगळंच सरस! ‘आगीत काय जळालं, ते राखेलाच माहिती’; बेधडक सईचा थरारक सिनेमा
2

Bol Bol Rani Trailer : संवाद, स्टोरी, सई… सगळंच सरस! ‘आगीत काय जळालं, ते राखेलाच माहिती’; बेधडक सईचा थरारक सिनेमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.