पुन्हा एकदा सलमानच्या मानवतेची झलक, 200 मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी भरवले नाशिकमध्ये मोफत शिबीर
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला आज विशेष ओळख नाही. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनयातून चर्चेत राहणाऱ्या भाईजानने आजवर आपल्या ‘बीइंग ह्यूमन फाऊंडेशन’ (Being Human Foundation) नावाच्या संस्थेतून समाजसेवेचे कार्य करत असतो. तो या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी आणि शिक्षणासाठी मदत करत असतो. त्याने आजवर अनेकांना या संस्थेच्या माध्यमातून मदतही केली आहे. आता अशातच अभिनेत्याने आपल्या ‘बीइंग ह्यूमन फाऊंडेशन’च्या माध्यमातून काही गरजु मुलांना ‘एक हात मदतीचा’ देत हृदयरोग विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बॉलिवूड सुपरस्टार आणि भाईजान सलमान खानने ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’च्या माध्यमातून रविवार, २३ मार्च २०२५ रोजी नाशिकमधील मालेगाव येथे हृदयरोग विषयक शिबिराचे आयोजन केले होते. अभिनेत्याने आयोजित केलेल्या शिबिराचा २०० हून अधिक मुलांनी फायदा घेतला. या शिबिरात त्यांच्या आरोग्यविषयक कोणत्याही संभाव्य समस्या ओळखण्याकरता मोफत ‘हृदय तपासणी’ तसेच आणि ‘टू डी इको चाचणी’ करण्यात आली. ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’तर्फे गावा- खेड्यातील लोकांना आणि गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ‘हृदय विषयक शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. भाईजानने आयोजित केलेल्या शिबिराचा मुख्य उद्देश वंचित पार्श्वभूमी असलेल्या मुलांमधील हृदयासंबंधित आजार ओळखणे आणि त्या आजाराला प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.
Raakh Review : धक्कादायक गुन्हेगारीचा थरार, ‘राख’ खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक…
‘हृदयविकाराचा धोका’ अथवा हृदयासंबंधित समस्या समजून घेण्याकरता ‘टू डी इको चाचणी’ करण्यात आली, जेणे करून हृदयविकार आढळून आल्यास त्यावर त्वरित उपचार करता येईल. कोणतीही व्यक्तिरेखा असो, अगदी लिलया साकारणारा सलमान खान ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’त्याच्या फाऊंडेशनद्वारे सामाजिक कार्य कुठलाही गाजावाजा न करता करत आहे. एक मानवतावादी व्यक्ती या अर्थाने सलमान आपल्या प्रसिद्धीचा आणि संपत्तीचा वापर वंचितांच्या जीवनात आनंद फुलवण्याकरता करत आहे. प्रामुख्याने, आरोग्य सेवा, शिक्षण आणि बालकल्याण या क्षेत्रांत सलमानने अत्यंत प्रभावी काम केले आहे. मात्र, बहुतेक वेळा दुर्लक्षित असलेली गोष्ट म्हणजे सलमानची वंचितांकरता असलेली करुणा आणि त्यांच्या कल्याणाकरता सलमानचे सतत काम करणे. मालेगावमधील ‘हृदय विषयक शिबीर’च्या माध्यमातून सलमान खान त्याची माणूसकी पाहायला मिळाली, ज्यावर माध्यमांतून क्वचितच प्रकाशझोत पडतो.
एक लोकप्रिय कलाकार म्हणून, सलमान कायमच त्याच्या चित्रपटातून किंवा कुठल्याही त्याच्या कृतीतून तो चर्चेत असतो. पण सलमानने गरजूंना मदत करत, वंचित व्यक्तींच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडवण्यात योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय निवडला आहे. ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’ ही सलमान खानने स्थापन केलेली एक “ना-नफा, ना- तोटा” या तत्त्वावर काम करणारी स्वयंसेवी संस्था सुरु केली आहे. ज्या संस्थेद्वारे तो गरजूंना आरोग्य सेवा आणि शिक्षण विषयक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो.