(फोटो सौजन्य - अकाउंट)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक विकास जयराम फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खरं तर, त्यांनी हिंदूंच्या होळी सणावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल फराह खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. आता याचबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
फराह खानवर लावले हे आरोप
हिंदुस्थानी भाऊच्या याचिकेनुसार, फराह खानने फेब्रुवारी २०२५ मध्ये सेलिब्रिटी मास्टरशेफच्या एका भागात अपमानास्पद टिप्पणी केली होती, ज्यामध्ये तिने होळीला छपरीचा सण म्हणून वर्णन केले होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की छपरी हा शब्द मोठ्या प्रमाणात नकारात्मक अर्थाने वापरला जात होता, जो संस्कृतीचा अभाव दर्शवितो.
फराहवर कारवाईची केली मागणी
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक विकास जयराम फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ त्यांनी असा दावा केला की फराह खानने एका लोकप्रिय सार्वजनिक व्यासपीठावर केलेल्या टिप्पण्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे जातीय द्वेष निर्माण होऊ शकतो. हिंदुस्थानी भाऊ यांनी २१ फेब्रुवारी रोजी खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि फराह खानविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
Raakh Review : धक्कादायक गुन्हेगारीचा थरार, ‘राख’ खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक…
यासाठी त्यांनी न्यायालयात घेतली धाव
जेव्हा एफआयआर नोंदवला गेला नाही, तेव्हा हिंदुस्तानी भाऊ त्यांनी उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रयत्नांनंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, फाटक यांनी आता फराह खानविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.