Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमच्यासाठी पण शिवाजी महाराज दैवतच… जो महाराष्ट्रात’, विकी कौशलचं प्रांजळ मत, मराठीतील साधेपणा होतोय व्हायरल

चित्रपटानिमित्त दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशलने मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये मनमोकळा संवाद साधला. अभिनेता विकी कौशलने मुलाखतीमध्ये मी मराठी नसलो तरीही मुळचा महाराष्ट्रीयन आहे, असं म्हणाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 04, 2025 | 12:49 PM
Vicky Kaushal opinion on Chhatrapati Shivaji Maharaj's simplicity in Marathi is going viral

Vicky Kaushal opinion on Chhatrapati Shivaji Maharaj's simplicity in Marathi is going viral

Follow Us
Close
Follow Us:

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Director Laxman Utekar) ‘छावा’ (chhaava movie)चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटानिमित्त दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशलने एका मराठी वृत्तपात्राला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये मनमोकळा संवाद साधला.

Urmila Matondkar Birthday: ‘रंगीला गर्ल’चं करिअर एका चुकीने झालं होतं उद्धवस्त; हिरोंपेक्षाही जास्त घ्यायची मानधन

अभिनेता विकी कौशलने मुलाखतीमध्ये मी मराठी नसलो तरीही मुळचा महाराष्ट्रीयन आहे, असं म्हणाला आहे. मुलाखतीमध्ये विकी कौशल म्हणतो, “माझा जन्म मुंबईतल्या मालाडमधील एका मालवणी कॉलनीमध्ये झाला आहे. मग नंतर पुढे आम्ही अंधेरीमध्ये वन बेडरुम असलेल्या रुममध्ये शिफ्ट झालो. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी शाळेतंच झालं आहे. मी SSC बोर्डमध्येच शिकलोय. एक गोष्ट सांगतो, मला दहावीमध्ये असताना मराठी विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि इंग्लिशमध्ये खूप कमी मार्क्स आले होते. त्यासोबतच माझे क्रिकेट खेळणारे मित्रही मराठीच होते. त्यामुळे माझं लहानपणापासून फार चांगलं मराठी आहे.”

Hera Pheri 3: ‘माझ्याशिवाय स्टारकास्ट पूर्ण होणार नाही’, तब्बूने प्रियदर्शनच्या ‘हेरा फेरी ३’ चित्रपटासाठी दाखवला उत्साह!

“खरंतर, मला मराठी बोलायला येतं. म्हणजे फार छान नाही पण मी बोलू शकतो आणि मला मराठी समजतंही. मला असं वाटतं की, जो पण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्मलाय किंवा काम करतोय त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. त्यांना कोणीही सांगायची गरज पडली नाही पाहिजे. खरंतर, इतरत्र भाषिक असलेल्या लोकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. आता मी एका पंजाबी कुटुंबामध्ये लहानाचं मोठा झालोय. पण ते आमच्यासाठीही एक आराध्यदैवतच आहेत. आणि असं नाही की आम्हाला कोणी सांगितलंय किंवा आम्हाला कोणी बोललंय. तर नाही. महाराजांप्रती आदर आणि प्रेम जो काही आहे तो मी माझ्या लहानपणापासूनच पाहत आलोय. ज्या बिल्डिंगमध्ये मी लहानाचं मोठं झालोय, त्या बिल्डिंगीच्या गेटवरच नेहमी महाराजांची मुर्ती असायची. त्यांची रोज पूजा- अर्चा केली जायची. त्यांच्या मुर्तीचा हार कायम बदलला जायचा. आम्ही त्यांच्यासमोरच क्रिकेट खेळलोय. आमच्यामध्ये बालपणापासूनच महाराजांप्रती प्रेम आणि आदर आहे.”

“आता आमचा एकच ध्यास आहे की, संपूर्ण जगभरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही जागृतता निर्माण करायची आहे आणि ती सध्या आम्ही करतोय. आमचा मुख्य हेतू हाच आहे की, त्यांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती असली पाहिजे.” असं अभिनेता मुलाखतीमध्ये म्हणाला.

Web Title: Bollywood actor vicky kaushal interview vicky kaushal opinion on chhatrapati shivaji maharajs simplicity in marathi is going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Chatrapati Sambhaji Raje
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
3

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार
4

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.