Urmila Matondkar Birthday: 'रंगीला गर्ल'चं करिअर एका चुकीने झालं होतं उद्धवस्त; हिरोंपेक्षाही जास्त घ्यायची मानधन
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने आपल्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली. ती अशी एक अभिनेत्री होती जिने ९० च्या दशकात इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर खळबळ माजवली होती. ती बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींमध्ये येते, ज्यांनी कधीकाळी हिरोंपेक्षाही जास्त मानधन घेतले. मात्र नंतर ती संसारात व्यस्त झाल्यामुळे ती एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाली. या अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्यात एक चूक केली होती, जी तिला महागात पडली होती. यानंतर तिच्या करिअरचा आलेख घसरायला लागला. तिच्या करिअरमध्ये एक वेळ आली जेव्हा तिला अचानक काम मिळणे बंद झाले.
आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर होय. जी ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘भूत’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये ती झळकली. शिवाय, तिने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं. उर्मिला मातोंडकरला रामगोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ चित्रपटातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. ‘रंगीला’ चित्रपटानंतर रामगोपाल वर्मा यांच्या अनेक चित्रपटांतून उर्मिला मातोंडकरने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर रंगली होती. त्याच दरम्यान, रामगोपाल वर्मा यांच्या चित्रपटातून माधुरी दीक्षितला काढून उर्मिलाला कास्ट केलं होतं.
अनेक मीडिया रिपोर्टनुसार, ज्यावेळी रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीला रामगोपालच्या आणि उर्मिलाच्या अफेअरबद्दल कळलं. त्यावेळी तिने थेट उर्मिलाच्या कानाशिलातच लगावली होती. इतकंच नाही तर, उर्मिलासोबतच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत घटस्फोटही केला होता. आणि त्यानंतर उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांचं उर्मिलासोबतचं नातंही संपुष्टात आलं होतं. त्यांच्या ह्या अफेअर्समुळे उर्मिलाच्या करियरची राख रांगोळी झाली होती.
काय सांगता! ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? स्वतः दिलं उत्तरं…
२०१६ मध्ये उर्मिलाने ९ वर्ष लहान असलेला बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत गुपचूप लग्न केलं होतं. मोहसीन अख्तरची आणि उर्मिलाची मनीष मल्होत्राने भेट करुन दिली होती. मोहसिन अख्तर मुळचा काश्मिरचा आहे. उर्मिला मातोंडकर पहिल्यांदा १९८९ मध्ये रिलीज झालेल्या ‘चाणक्य’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली होती. उर्मिलाने आपल्या वादग्रस्त सिनेकारकिर्दित मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केलेय.