Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा कशी आली? पोस्ट शेअर करत सांगितली जुनी आठवण

छाया कदम यांची फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री चुकून झाली, असं त्या स्वत: सांगतात. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 14, 2025 | 05:47 PM
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा कशी आली? पोस्ट शेअर करत सांगितली जुनी आठवण

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा कशी आली? पोस्ट शेअर करत सांगितली जुनी आठवण

Follow Us
Close
Follow Us:

‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘झुंड’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये छाप पाडणाऱ्या छाया कदम कमालीच्या चर्चेत आल्या आहेत. कायमच आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या छाया यांच्यासाठी २०२४ हे वर्ष एकदम खास ठरलं. वेगवेगळ्या कलाकृतींमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिकलं. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. हा सगळा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.

छाया कदम यांची फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री चुकून झाली, असं त्या स्वत: सांगतात. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते. पोस्ट शेअर करताना त्यांनी काही खास फोटोही शेअर केले आहेत.

‘ओ बावरी’ लव्हसाँगने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार अधिकच स्पेशल…

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातले काही जुने फोटो शेअर केले आहेत. ते फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की,

“खूप वर्षांनी हे फोटो समोर आले आणि मी अगदी पहिल्याच वेळेस कॅमेरा फेस केलेल्या दूरदर्शन वाहिनीच्या ‘फाट्यावरचे पाणी’ या लघुपटाची आठवण झाली. २००३ सालच्या जवळपास मला चुकून मिळालेली अभिनयाची ही संधी, पुढे माझ्या जगण्याची गोष्टच झाली. ती अगदी आजतागायत. आणि पुढेही अगदी शेवटापर्यंत कायम असेल. अनेक जणांसोबत बोलत असताना, चर्चा करत असताना. तर कधी मुलाखतीमधून प्रत्येकवेळी ही आठवण माझ्याकडून सांगितलीच जाते. कारण तिथूनच माझ्यात कॅमेराच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे नाटक, मालिका आणि चित्रपट असा प्रवास वाढत गेला.” “खरंतर या लघुपटात अभिनयाचे काम मागण्यासाठी मी दूरदर्शनमध्ये गेले होते, पण आधीच सगळी कास्टिंग झाल्या कारणाने त्यांनी मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घेतले आणि पुढे मी शूटिंगसाठी संपूर्ण टीमसोबत बारामतीला गेले आणि अगदी शूटच्या दिवशी कास्टिंग झालेली अभिनेत्री काही कारणास्तव पोहचू शकणार नाही हे कळताच मला अभिनयासाठी उभे राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी दिग्दर्शक असलेल्या शरण बिराजदार सरांनी माझ्यावर ऐनवेळी ठेवलेला विश्वास आणि अरुण नलावडे दादा व नंदू माधव यांच्या सोबत मी काम करत असताना त्यांनी मला सांभाळून घेतलेली आपलेपणाची भावना माझ्यासाठी आनंद देणारी होती. तसेच त्यावेळी माझ्याबरोबर असिस्टंट म्हणून सोबत असलेल्या संदेश राणे या मित्राला कधीच विसरू शकत नाही. आणि मला बिराजदार सरांपर्यंत पोहचण्यास ज्यांनी मदत केली ते रवी मुरबाडकर यांनाही विसरू शकत नाही. आठवणी अश्याच असतात. आज आपण कुठे आहोत यापेक्षा आपण कुठून सुरुवात केली होती, त्या जिद्दीची गोष्ट आपल्याला पुन्हा नव्याने ऐकवतात. हा फोटो पाहताना पुन्हा एकदा असे वाटले की, अनेक वर्षांपूर्वी मी जी काही कॅमेरा समोर ठाण मांडून बसले होते, ते अगदी आज पर्यंत कॅमेराच्या डोळ्यात डोळे घालून बोलत आहे. आणि बोलत राहीन.”

‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादू, अभिजित खांडकेकरसोबत जुळणार लव्हकेमिस्ट्री!

Web Title: Bollywood actress chhaya kadam post viral laapataa ladies actress share old memories of career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi film

संबंधित बातम्या

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”
1

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!
2

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
3

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
4

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.