Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepika Padukone : कतरिना कैफने ‘त्या’ चित्रपटाला नकार दिला नसता तर दीपिका पादुकोण ‘बॉलिवूडची मस्तानी’ बनली नसती; वाचा सविस्तर

'आँखो मे तेरी...' गाण्याच्या माध्यमातून एन्ट्री घेणाऱ्या दीपिकाने प्रेक्षकांना अक्षरश: आपल्या एका नजरेतच घायाळ केले. 'ओम शांती ओम' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 05, 2025 | 07:45 AM
Deepika Padukone : कतरिना कैफने 'त्या' चित्रपटाला नकार दिला नसता तर दीपिका पादुकोण 'बॉलिवूडची मस्तानी' बनली नसती; वाचा सविस्तर

Deepika Padukone : कतरिना कैफने 'त्या' चित्रपटाला नकार दिला नसता तर दीपिका पादुकोण 'बॉलिवूडची मस्तानी' बनली नसती; वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

‘ऑंखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है’ या गाण्याच्या माध्यमातून एंट्री घेणाऱ्या दीपिकाने प्रेक्षकांना अक्षरश: आपल्या एका नजरेतच घायाळ केले. ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या दीपिका पादुकोणचा आज ३९ वा वाढदिवस आहे. अवघ्या इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांमध्ये ‘बॉलिवूडची मस्तानी’ म्हणून तिला ओळख मिळाली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या दीपिकासाठी हा चित्रपट मिळणं म्हणजे फार विशेष आहे. कतरिनाचे अनेक नकार दीपिकासाठी खूप खास ठरले आहे, कसे ते जाणून घेऊया…

‘इलू इलू’चित्रपटात प्रसिद्ध बिग बॉस मराठी ४ अभिनेत्रीची एन्ट्री, दिसणार बोल्ड ब्युटीफुल अंदाजात

दीपिका पादुकोण ही प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची लेक आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तिने बॅडमिंटन खेळात नॅशनल लेव्हलपर्यंत मजल मारली आहे. शिवाय, दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रातही आपलं नाव कमावलं आहे. तिने बॉलिवूडमध्येही डेब्यू करताच तिला विशेष लोकप्रियता मिळाली. दीपिकाने ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. दीपिका पादुकोणच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपट तिच्यासाठी टर्निंग पॉईंट चित्रपट ठरलेय. कतरिना कैफचे अनेक नकार दीपिकासाठी खूप खास ठरलेय. कतरिनाने तब्बल ४ ते ५ चित्रपटांना नकार दिला होता. त्यामुळे दीपिकाला त्या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सारा अली खान करणार स्क्रिन शेअर, चित्रपटाची तारीख ठरली; ट्रेलर केव्हा रिलीज होणार?

२०१३ साली थिएटरमध्ये, आमिर खान आणि कतरिना कैफचा एक चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. तो चित्रपट आधी दीपिका पादुकोणला ऑफर करण्यात आला होता पण तिने त्या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. त्यानंतर तो चित्रपट कतरिना कैफला मिळाला. चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. त्यानंतर, ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील मीना लोचानीच्या भूमिकेसाठी रोहित शेट्टीची पहिली पसंती कतरिना कैफची होती. ‘जब तक है जान’मध्ये शाहरुख खानची आणि कतरिनाची हिट जोडी झाल्यानंतर रोहितला शाहरुखसोबत कतरिनालाही आपल्या चित्रपटात कास्ट करायचे होते. पण अभिनेत्रीने ती ऑफर नाकारली होती. त्यानंतर रोहितने त्या चित्रपटात दीपिका पादुकोणला कास्ट करण्याचे ठरवले. फक्त किंग खानचीच नाही तर, तिची भूमिकाही चाहत्यांना फारच भावली.

Bigg Boss 18: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर करणवीर मेहराची झलक; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले, “आता विजय निश्चित…”

त्यानंतर ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटासंबंधितही असंच झालं. या चित्रपटासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जीची पहिली पसंती ही कतरिनाच होती, पण तिने त्या चित्रपटालाही नकार दिला. चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणने रणबीर कपूरने एकत्र काम केले असून दोघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर,संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अफलातून अभिनय केला होता. दरम्यान, चित्रपटामध्ये संजय लीला भन्साळींना कतरिना कैफला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे होते. पण काही कारणास्तव तिने चित्रपट नाकारला आणि दीपिकाला हा चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळेच दीपिकाला ‘बॉलिवूडची मस्तानी’ म्हणून खरी ओळख मिळाली. त्यानंतर, ‘गोलियों की रासलीला: राम लीला’ चित्रपटासाठी पूर्वी करीना कपूरला विचारण्यात आले होते. पण शुटिंगच्या काही दिवस आधीच करीनाला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि दीपिका पादुकोणला चित्रपटाची ऑफर मिळाली.

तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’साठी अभिनेता सुबोध भावे ऑनबोर्ड !!

खरंतर, दीपिका पादुकोणचा बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री होण्याचा काही साधा प्रवास नव्हता. तिने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. तुम्हाला माहीत नसेल पण दीपिका पादुकोण संजय लीला भन्साळीच्या ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसली असती, पण ‘सावरिया’ चित्रपटाची ऑफर सोनम कपूरकडे गेली. त्यामुळे तिचे बॉलिवूड डेब्यू लांबले. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी आई- बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लेकीचं नाव ठेवले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या लेकीचं नाव तिने चाहत्यांना सांगितले आहे.

Shankar: ‘गेम चेंजर’ नंतर आता शंकर कोणता चित्रपट करणार? दिग्दर्शकाने ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितले सत्य!

नाव सांगताना आणि नावाचा अर्थ सांगताना अभिनेत्री म्हणाली, “दुआ पादुकोण सिंह… ‘दुआ’ म्हणजेच प्रार्थना…” दीपिका ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईतल्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली, त्यानंतर तिने ८ तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर दीपिकाला आणि तिच्या बाळाला आठवड्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. म्हणजेच १५ सप्टेंबरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

Web Title: Bollywood actress deepika padukone birthday movie chennai express yeh jawaani hai deewani bajirao mastani these blockbuster films was rejected by katrina kaif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Deepika Padukone

संबंधित बातम्या

‘मी खूप मेहनत घेतली’, Dhurandharबद्दल रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत; भूमिकेसाठी घटवलं ‘एवढे’ वजन
1

‘मी खूप मेहनत घेतली’, Dhurandharबद्दल रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत; भूमिकेसाठी घटवलं ‘एवढे’ वजन

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन
2

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’
3

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’

कुणाचा ब्रेकअप, कुणाचं मोडलं लग्न; 2025 मध्ये ‘या’  सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात पडली दरी, संसार उद्ध्वस्त
4

कुणाचा ब्रेकअप, कुणाचं मोडलं लग्न; 2025 मध्ये ‘या’ सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात पडली दरी, संसार उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.