
फोटो सौजन्य - Social Media
शक्ती कपूर यांनी केली पोस्ट?
अभिनेते शक्ती कपूर त्यांच्या निधनाची अफवा ऐकून चांगलेच चिताळले आहेत. आपल्या चाहत्यांमध्ये पसरलेले दुःखाचे सावट पाहून त्यांना त्यातून सावरण्यासाठी आणि सोशल मीडियावर viral असणाऱ्या आपल्या निधनाच्या बातमीला बंद करण्यासाठी शक्ती कपूर स्वतःच समोर आले आहेत. त्यांनी त्यांच्या @shaktikapoor या Social Media Handle वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “नमस्कार! माझ्या निधनाची बातमी निव्वळ अफवा आहे. मी ठीक आहे आणि निरोगी आहे. कृपया करून त्या बातमीला दुर्लक्षित कराल अशी आशा!”
मुळात, ते पुढे म्हणतात की, “मी आता Cyber मध्ये जाऊन याविषयी Complaint करणार आहे.” एकंदरीत, या संपूर्ण अफवांच्या कारस्थानात केंद्रबिंदू असणाऱ्याला शक्ती कपूर चांगलीच अद्दल घडवणाच्या तयारीत दिसून येत आहेत. Film Industry त हे पहिल्यांदा घडत नसून, याआधी दिग्गज गायिका दिवंगत लता मंगेशकर या हयात असतानादेखील त्यांच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरवण्यात आली होती. सिनेचाहत्यांनी कसलाही विचार आणि संशोधन करता कुणाच्या निधनाची बातमी किंवा अफवा पसरवणाऱ्या माध्यमावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
चाहत्यांचा कमेंट्समध्ये प्रतिसाद
शक्ती कपूर यांना निरोगी आणि महत्वाचे म्हणजे समोर पाहून चाहत्यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी त्या पोस्टखाली भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक चाहत्यांनी तसेच सिनेकलाकारांनी शक्ती कपूर यांच्या लांब आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.