Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एक दिन’च्या स्क्रीनिंगला खास रंग! Aamir Khan ने लेकासह घेतली थिएटरमध्ये Entry, चाहत्यांचा आक्रोश

Aamir Khan निर्मित ‘Ek Din’ चित्रपटाला रिलीज होताच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात Sai Pallavi आणि Junaid Khan यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 05:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Aamir Khan यांच्या Aamir Khan Productions च्या बॅनरखाली तयार झालेला ‘Ek Din’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हलक्या, कोमल रोमँटिक कथानकामुळे या चित्रपटाची आधीपासूनच चर्चा होती, आणि रिलीज होताच त्या चर्चेला खऱ्या अर्थाने उधाण आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून Sai Pallavi आणि Junaid Khan ही नवी जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत असून त्यांच्या केमिस्ट्रीचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

Marathi Movie : “मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, हे रडगाणं…” सचिन खेडेकरांचा तो सवाल! मांजरेकर स्पष्टच बोलले

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याच्या स्क्रीनिंगला एक खास रंग चढला, जेव्हा आमिर खान, जुनैद खान आणि दिग्दर्शक Sunil Pandey स्वतः थिएटरमध्ये पोहोचले. कोणतीही पूर्वसूचना न देता दिलेल्या या सरप्राइजमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात या कलाकारांचे स्वागत केले. आमिर आणि जुनैद यांनी प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि चित्रपटाबद्दल संवाद साधला. त्यामुळे हा अनुभव चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

या भेटीदरम्यान अनेक चाहत्यांनी कलाकारांसोबत फोटो काढले, त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि सोशल मीडियावरही हा खास क्षण मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी आधीच प्रेक्षकांची मने जिंकली होती, त्यामुळे थिएटरमध्येही त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या ‘एक दिन’ची थिएट्रिकल रन जोरदार सुरू असून पुढील काही दिवसांतही चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे आमिर खान आणि Mansoor Khan यांची दीर्घ काळानंतर झालेली पुनर्भेट. या जोडीने याआधी Qayamat Se Qayamat Tak, Jo Jeeta Wohi Sikandar, Akele Hum Akele Tum आणि Jaane Tu… Ya Jaane Na यांसारखे गाजलेले चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ‘एक दिन’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Raja Shivaji : सिनेमाच्या दिग्दर्शकाने प्रेक्षकांना केली खास विनंती! Riteish Deshmukh म्हणाला “कृपया, Videos काढू…”

‘एक दिन’ हा चित्रपट आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी निर्मित केला असून दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले आहे. साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने रोमँटिक शैलीत एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हा चित्रपट देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

Web Title: A special flair at the ek din screening aamir khan makes an entry into the theater with his son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Aamir Khan

संबंधित बातम्या

“मी खूप लाजाळू…”, ‘Ek Din’ च्या निमित्ताने Aamir Khan ने केला खुलासा, उलगडला जुन्या आठवणींचा पिटारा
1

“मी खूप लाजाळू…”, ‘Ek Din’ च्या निमित्ताने Aamir Khan ने केला खुलासा, उलगडला जुन्या आठवणींचा पिटारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.