Sitaare Zameen Par Collection: दुसऱ्या दिवशी 'सितारे जमीन पर'ची गगन भरारी, आमिर-जेनेलियाच्या चित्रपटानं कमावले कोट्यवधी रुपये
आमिर खानचा ‘सितारे जमिन पर’ चित्रपट २० जूनला रिलीज झाला आहे. चित्रपटाला पहिल्या विकेंडला उत्तम प्रतिसाद भेटताना दिसत आहे. आमिर खान आणि जेनेलिया देशमुख स्टारर चित्रपटाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला होता, परंतु आता चित्रपटाने दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या दुप्पटीने कमाई केलेली आहे. चाहत्यांसोबतच प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल…
सर्जरीनंतर दीपिका कक्कर परतली सोशल मीडियावर; पती शोएब इब्राहिमनंतर, आता मुलासाठी लिहिली पोस्ट!
आर एस प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमिन पर’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २१ कोटी ५० लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने शेअर केलेला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ११ कोटी ७० लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत ३२ कोटी २० लाखांची कमाई केलेली आहे. ८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट येत्या आगामी काळात किती कमाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चित्रपट निर्मात्यांना पहिल्या विकेंडचा जबरदस्त फायदा झाला, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
अद्याप निर्मात्यांकडून चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. अधिकृत आकडेवरीमध्ये थोडा फरक असू शकेल. पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये आणि शनिवारच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणावर चाहत्यांना तफावत पाहायला मिळतेय. आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यामध्ये रविवारच्या दिवशी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आहेत, ‘तारे जमीन पर’ने ‘सितारे जमीन पर’च्या तुलनेत २००७ मध्ये प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २.६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी तो चित्रपट हिट झाला होता.
‘ये रिश्ता…’ फेम लता सबरवाल- संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार…
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनयात ब्रेक घेतला होता. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिर खानने रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. २००७ साली रिलीज झालेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दरम्यान, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आमिर खानच्या करियरमधला पहिला वहिला सिक्वेल चित्रपट आहे. आरएस प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन निर्मित, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटांत आमिर आणि जेनेलिया व्यतिरिक्त इतर १० नवोदित कलाकार देखील आहेत. आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर, अशी त्या कलाकारांची नावं आहेत.