aai tuljabhavani colors marathi serial special episode
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत असुरीशक्तींच्या वर्चस्वासाठीचा संघर्ष आता अधिक गहिरा होत असून, देवी तुळजाभवानीचा शोध घेत माया थेट छोट्या जगदंबाच्या घरी पोहचणार आहे. गंगाईच्या मांडीवर विसावलेली बाल जगदंबा, शांत मंगलमय वातावरण… पण अचानक माया या असुरीशक्तीचा प्रवेश तिथे होतो आणि त्या वातावरणाला एक भीतीदायक कलाटणी मिळते. “ह्यांना तर झोपवलं… आता तुझा काळ जवळ आलाय, तुळजा!”, असं म्हणत माया तिची असुरीशक्ति प्रकटते.
‘ये रिश्ता…’ फेम लता सबरवाल- संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार…
मात्र तिच्या मार्गात उभे राहतात अनेक दैवी त्रिशूल आणि घराभोवती पसरतं दैवी तेज. दरवाजा उघडतो आणि जगदंबा तेजस्वी रूपात समोर येते. “ही ताकद माझी नाही… माझ्या आईच्या अंगाईची आहे.” आणि यामुळेच संतापून माया जगदंबाला आव्हान देताना म्हणते, “इथून तुला मी घेऊनच जाणार… मला कमी लेखू नकोस!” मात्र त्यानंतर घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी आणि जगदंबाने निर्माण केलेले आव्हान यामुळे पुढे काय होणार ही उत्सुकता निर्माण होते. माया म्हणजेच षड्रिपूंमध्येली एक आहे, माया शक्तिशाली रूपात प्रकट झाली आहे.
इंदूला मिळणार का अधूची खंबीर साथ ? ‘इंद्रायणी’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार
लोभ, क्रोध, मोह, मत्सर, मद व माया या षड्रिपूंच्या प्रभावाने आणि त्यांना नियंत्रित केल्याने महिषासुर अधिक बलशाली झाला आहे. यामुळे बाल जगदंबेच्या मार्गातील अडथळे अधिकच वाढताना दिसत आहेत. ही ‘माया’ केवळ षड्रिपूंतील एक नसून ती संपूर्ण सृष्टी उध्वस्त करू शकते. त्यामुळे तिचे बलाढ्य मायावी आव्हानं आणि देवीच्या भक्तीचा अद्वितीय प्रवास यांचा संगम येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे. या अत्यंत क्रूर आणि विध्वंसक शक्तींच्या सहकार्याने महिषासुर आपल्या अंतिम उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ पोहोचत आहे. माया… जिची लीला साक्षात भ्रम निर्माण करू शकते. जी आपल्या सावलीतूनही माणसांची ओळख मिटवू शकते. माया… जिचा खेळ भलत्या-भलत्यांना चकवतो. अश्या यामायामुले आता बाल जगदंबेला स्वतःच्या अस्तित्वाचाच सामना करावा लागणार आहे. त्यातून निर्माण होणारा संघर्ष हा अभूतपूर्व असेल. आता या मायाचा विनाश बालरूपातील आई तुळजाभवानी कशी करणार हे जाणून घेण्यासाठी पहा आई तुळजाभवानी २२ जून दु. ३ आणि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.