(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानबद्दल एक अफवा वेगाने पसरत आहे. मुंबईच्या रस्त्यांवर भिकारी म्हणून व्हायरल होणार व्हिडीओमध्ये तो दुसरा तिसरा कोणी नसून आमिर खान असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर पूर्णपणे भिकाऱ्यासारखा पोशाख घातलेला दिसणारा माणूस आमिर खान आहे असे लोक मानू लागले आहेत. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. ही व्यक्ती आमिर खान नाही आणि त्याचा आमिरशी काहीही संबंध नाही. याची माहिती स्वतः अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राने चाहत्यांना माहिती दिली आहे की खोटी बातमी पसरवू नका आणि यावर विश्वास ठेवू नका असे देखील त्यांनी सांगितले आहे.
बहुचर्चित ‘स्थळ’ मनोरंजक मराठी चित्रपटाचा टीझर लाँच; प्रेक्षकांना आता ट्रेलरची उत्सुकता!
आमिर खान ‘केवमैन’ बनला नाही
मुंबईच्या रस्त्यांवरील एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो उग्र आणि जुन्या पद्धतीच्या मानवी पोशाखात दिसत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ आमिर खानशी जोडला आणि तो या नवीन लूकसह चित्रपटाचे शूटिंग करत असल्याची अटकळ सुर केली. पण आता एका सूत्राने या अफवेला पूर्णविराम देत म्हटले आहे की हा माणूस आमिर खान नाही. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे देखील त्यांनी म्हटले आहे. सूत्राने स्पष्टपणे सांगितले की, ‘मुंबईच्या रस्त्यांवर ‘केवमैन’सारखा पोशाख घातलेला माणूस आमिर खान नाही.’ कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका कारण त्या सर्व खोट्या आहेत.’ असे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरणाऱ्या एका माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोस्ट होताच हा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला. यानंतर, आमिर खानच्या नावाने व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. अनेकांनी तो माणूस आमिर खान म्हणून ओळखला आणि तो एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन किंवा शूटिंग करत असल्याचा दावा केला.
आमिर एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
तथापि, आता हे स्पष्ट झाले आहे की ही व्यक्ती आमिर खान नाही. आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या आमिर त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.