Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला विश्वास नव्हता…’, आमिर खानने दीड वर्षे केला लग्न वाचवण्याचा प्रयत्न, विवाह समुपदेशनाचीही घेतली मदत!

आमिर खानने अलीकडेच खुलासा केला की त्याने त्याची पहिली पत्नी रीना दत्तासोबतचे नाते वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. अभिनेता या सगळ्यांचा खुलासा आता केला आहे. आमिर खान नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 27, 2025 | 11:03 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

घटस्फोटानंतरही, आमिर खानचे त्याच्या एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता यांच्याशी खूप चांगले संबंध ठेवले आहेत. अभिनेत्याची मुलगी आयरा खानच्या लग्नात आमिरच्या संपूर्ण कुटुंबाचे आनंदाचे नाते दिसून आले. आपल्या कुटुंबातील सुस्थापित नातेसंबंधांबद्दल बोलताना, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणाला की, त्यांची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यापासून घटस्फोट घेत असताना, अभिनेत्याने त्यांचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या जोडप्याने विवाह सल्लागाराचीही मदत घेतली, पण अखेर ते परस्पर संमतीने वेगळे झाले.

पिंकव्हिलाशी बोलताना आमिर खान म्हणाला की, सुरुवातीला तो लग्नाच्या समुपदेशनाच्या विरोधात होता, परंतु २-३ सत्रांनंतर तो त्याच्या समुपदेशकावर विश्वास ठेवू लागला. अभिनेत्याने सांगितले की तो सुमारे दीड वर्षे विवाह सल्लागाराकडे गेला आणि त्यांची मदत घेतली.

‘काश्मीर आमचं आहे…’, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर रितेश देशमुखने पाकिस्तानवर व्यक्त केला संताप!

आमिर खान सुरुवातीला विवाह समुपदेशनाच्या विरोधात होता
आमिर खानला विचारण्यात आले की त्याने पहिल्यांदा थेरपी कधी घेतली? तो म्हणाला, ‘मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा… ती थेरपी नव्हती; मला वाटतं ते समुपदेशनासारखं होतं.’ तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा रीना आणि मी वेगळे होत होतो, तेव्हा आम्ही सुमारे दीड वर्षे विवाह सल्लागाराकडे गेलो होतो. थेरपी आणि समुपदेशनाचा तो माझा पहिला अनुभव होता. आणि मला आठवतंय की मी त्याच्या पूर्णपणे विरोधात होतो. मी त्याच्या खूप विरोध केला. त्याने रीनाला सांगितले की त्याला त्याच्या भावना किंवा अनोळखी व्यक्तीशी असलेल्या नात्याबद्दल बोलायचे नाही. “मी माझे हृदय एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर कसे उघड करू?” असं अभिनेता म्हणाला.

अभिनेत्याचे म्हणणे आहे की त्याची एक्स पत्नी रीना दत्ता हिने त्याला विवाह सल्लागाराकडे जाण्यास भाग पाडले होते. आमिर म्हणाला की सुरुवातीला तो संकोच करत असला तरी त्याचा अनुभव त्याच्या भीतीच्या पूर्णपणे विरुद्ध होता. तो म्हणतो की पहिल्या सत्रांमध्ये तो खूप शांत राहिला आणि जास्त बोलत नव्हता, परंतु २-३ सत्रांनंतर तो त्याच्या थेरपिस्टवर विश्वास ठेवू लागला. अभिनेत्याने सांगितले की त्याच्या भीतीच्या उलट, परिस्थिती खूपच चांगली झाली.

Justin Bieber च्या जवळच्या व्यक्तीचे निधन, गायकाने पोस्टद्वारे व्यक्त केली भावना!

पहिल्या सत्रात आमिर खान संकोच करत होता
आमिर पुढे म्हणाला की, जेव्हा तुमच्याकडे एक चांगला थेरपिस्ट असतो तेव्हा हळूहळू विश्वासाची भावना निर्माण होते. जसजसा हा विश्वास वाढत जातो तसतसे त्याला ज्या गोष्टी व्यक्त करण्याचा पूर्वी संकोच वाटत होता त्याबद्दल उघडपणे बोलणे सोपे झाले. असं या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले.

आमिर खानचे त्याच्या दोन्ही पत्नींशी असलेले संबंध तुटले
आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत – मुलगी आयरा खान आणि मुलगा जुनैद खान. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर अभिनेत्याने दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले. आमिर खान आणि किरण राव देखील वेगळे झाले आहेत. आणि आता दोघेही एकमेकांच्या आयुष्यात चांगले मित्र म्हणून राहत आहेत.

Web Title: Aamir khan revealed seeked marriage counselling with ex wife reena dutta for years to save relation said was initially unsure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Divorce Case
  • entertainment
  • Kiran Rao

संबंधित बातम्या

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक
1

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.