(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबरच्या घरातून खूप दुःखद बातमी येत आहे. गायक जस्टिन बीबरचे आजोबा ब्रूस डेल यांचे २४ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले आहे. जस्टिनने स्वतः ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे आणि एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच वेळी, ही बातमी समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर दुःख व्यक्त केले आहे. जस्टिनची पोस्ट पाहून चाहते देखील दुःखी झाले आहेत. जस्टिनने ही पोस्ट शेअर करताना काय लिहिले जाणून घेऊयात.
जस्टिनने शेअर केली पोस्ट
जस्टिनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायकाने एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे. तसेच त्याच्या आजोबांसोबतचा एक फोटोही शेअर केला. पोस्टमध्ये, जस्टिनने ब्रूस डेलला भावनिक श्रद्धांजली वाहिली. जस्टिनच्या आजोबांचे वयाच्या ८० व्या वर्षी रोटरी हॉस्पिस स्ट्रॅटफोर्ड पर्थ येथे निधन झाले. ही पोस्ट शेअर करताना गायक खूप भावुक झाला होता.
‘झोपडीतून महालात येणे!’ वर्षा सोलंकीचा संघर्षमय प्रवास; नक्की वाचा
गायकाने लिहिली भावनिक नोट
जस्टिनने त्याची पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बाबा, मला आठवतंय मी नेहमीच तुमचे सर्व पैसे घ्यायचो. मला आठवतंय की तुम्ही मला सांगितलं होतं की आजीने तुम्हाला आठवड्यासाठी २० डॉलर्स दिले होते. शुक्रवारी रात्री हॉकी सामन्यादरम्यान मी नेहमीच तुम्हाला नाश्त्यावर खर्च करायला पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. आणि तुम्ही कोणताही विचार न करताना पैसे खर्च करायचे.’ असं त्याने या पोस्ट मध्ये लिहिले आहे. यावरून स्पष्ट होत आहे की गायक जस्टिन आणि त्याच्या आजोबांचे नाते खूप घट्ट आणि प्रेमळ होते.
समांथाचा ‘हा’ Look पाहिलात का? तांबूस केस… गहिरे डोळे… पहाल तर नव्याने प्रेमात पडाल
लोकांनी दुःख व्यक्त केले
गायकाने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्या आजोबासोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच ही पोस्ट पाहून चाहते देखील दुःखी झाले आहेत. इतकेच नाही तर जस्टिनची पत्नी हेली बीबरनेही ब्रूस डेलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच युजर्स या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो’. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्हाला प्रेम आणि भरपूर शक्ती पाठवत आहे’. अशा टिप्पण्या करून लोकांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.