
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र लवकरच ९० वर्षांचे होणार आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अचानक आलेल्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हे रूटीन हेल्थ चेकअप असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही दिवसांसाठी रुग्णालयात राहण्याचा निर्णय घेतला आहे.धर्मेंद्र यांच्याबद्दल आलेल्या तब्येतीच्या बातमीने चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता त्यांच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
धर्मेंद्र यांच्या टीमने स्पष्ट केलं आहे की, त्यांना फक्त नियमित आरोग्य तपासणीसाठी (रूटीन चेकअप) मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी लागते.
टीमने सांगितलं, “चिंता करण्यासारखं काहीच नाही. धर्मेंद्रजी पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे फक्त रूटीन चेकअप आहे, आणि लवकरच ते घरी परततील.”मिळालेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वीही धर्मेंद्र रुग्णालयात गेले होते, तेव्हाही त्यांनी आपले रूटीन चेकअप करून घेतले होते. सध्या ते पूर्णपणे ठणठणीत बरे आहेत. अचानक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठीच चिंता पसरली.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र अलीकडेच त्यांच्या आगामी चित्रपट ‘इक्कीस’च्या प्रमोशनमध्ये दिसले होते. धर्मेंद्र हे अजूनही चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. ते अगस्त्य नंदाच्या इक्कीस या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. यातील फूल पत्थर, चुपके चुपके, शोले आणि धरम वीर या सुपपहीट चित्रपटांचा समावेश आहे.