(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात मुरलीकांत पेटकर यांची प्रभावी भूमिका साकारल्याबद्दल सर्वोत्तम अभिनेत्याच्या विभागात यंदाच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या भूमिकेद्वारे, कार्तिकने अपरिचित असलेल्या महाराष्ट्राच्या नायकाचा पहिल्या भारतीय पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्याचा प्रेरणादायी प्रवास जिवंत केला आहे. ही बाब साऱ्या महाराष्ट्राकरता गौरवशाली ठरली आहे. कार्तिकने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका अत्यंत समरस होऊन निभावली आहे. या भूमिकेकरता अभिनेता म्हणून त्याने स्वतः मध्ये अनेक बदल केले होते. अत्यंत समर्पण भावनेने ही भूमिका करत पेटकर यांची मेहनत, लवचिकता अख्ख्या जगासमोर पेश केली आणि एका अर्थाने कार्तिक आर्यनने आपल्या भूमिकेतून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा अखेर झाला घटस्फोट, न्यायालयाने निर्णय केला जाहीर!
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्तिकने कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “२०२५ चा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ प्राप्त झाल्याने मी खरोखरच सन्मानित झालो आहे. माझ्याकरता आणि माझ्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मी ग्वाल्हेरचा असूनही, मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. या शहराने मला माझे नाव, प्रसिद्धी, घर आणि आज माझ्याकडे असलेले सर्व काही दिले आहे. लहानपणापासूनच माझे स्वप्न होते की, अभिनेता बनून मी मुंबईत यावे आणि तो निर्णय माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे, परिणामांची चिंता न करता कामावर लक्ष केंद्रित करायला हवे. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’सारखा पुरस्कार त्या विश्वासाचेच दाखले देतो. यापुढेही मी माझी कला वृद्धिंगत होण्याकरता स्वतःला वाहून घेईन, हे नक्की.” असे अभिनेता म्हणाला आहे.
अमाल मलिक Clinical depression ने ग्रस्त, भाऊ अरमान मलिक आणि कुटुंबासह तोडले संबंध!
‘चंदू चॅम्पियन’ मधील कार्तिकचा प्रवास हा केवळ चित्रपट परिवर्तनाचा नव्हता, तर भावनिकही होता. त्याने घेतलेली कठोर मेहनत, केलेली तयारी, तीव्र शारीरिक प्रशिक्षण आणि कथाकथनाविषयी त्याच्या मनात खोलवर रुजलेली आवड या सगळ्या बाबींमुळे कार्तिकने साकारलेली मुरलीकांत पेटकर यांची भूमिका खरोखरच संस्मरणीय ठवली. भारतीय चित्रपटसृष्टीचा परिघ अधिक व्यापक करणाऱ्या या भूमिकेसाठी, कार्तिक आर्यनला मिळालेला हा सन्मान त्याच्या अढळ समर्पणाला आणि वास्तव जीवनातील खऱ्याखुऱ्या नायकांप्रति त्याला वाटणाऱ्या आदरभावातून तो जे प्रभावी काम करतो, त्याचा दाखला आहे.