(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिंदी आणि तामिळ, तेलगू चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच तिच्या अभिनयाच्या कौशल्याने अभिनेत्रीचा चाहता वर्ग वाढला आहे. ‘अर्जुन रेड्डी’च्या यशानंतर शालिनीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, कारण ती केवळ एका शैलीपुरती मर्यादित नव्हती. यानंतर अभिनेत्रीने ‘महानती’ (2018), ‘118’ (2019) आणि ‘NTR: कथानायकुडू’ (2019) सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. आणि चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळवले. यानंतर शालिनीने रणवीर सिंगसोबत ‘जयेशभाई जोरदार’ (2022) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिने गर्भवती पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी देखील अभिनेत्रीने समीक्षकांची प्रशंसा मिळवली.
शालिनी पांडे ही भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट स्टार्सपैकी एक मानली जाते. ‘अर्जुन रेड्डी’ या तिच्या पहिल्या चित्रपटापासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’पर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. अलीकडेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे की शालिनी पांडेला धनुषच्या आगामी ‘इडली कढई’ या चित्रपटात झाकळणार आहे. अभिनेत्रींचे शूटिंग देखील सुरु झाले आहे.
‘महाराज’मधील किशोरीच्या भूमिकेचे प्रेक्षक आजही कौतुक करत असतानाच तिच्या पुढच्या ‘इडली कढई’ या चित्रपटाच्या बातमीने तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. अभिनेत्रीने हैद्राबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. धनुष दिग्दर्शित हा चित्रपट शालिनीचे तामिळ चित्रपटसृष्टीत कमबॅक मानला जात आहे. या चित्रपटात शालिनी एक अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी प्रेक्षकांना खूप आकर्षित करणार आहे. या चित्रपटात शालिनी पांडेच्या एंट्रीने तरुणांच्या मनात विशेष उत्साह आणि आकर्षण वाढणार आहे. तिच्या कास्टिंगबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे आणि यावेळी ती पडद्यावर काय नवीन आणते हे पाहण्यासाठी चाहते आणि प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
हे देखील वाचा- ऐश्वर्या रायला टक्कर देत अभिनेत्री प्रिया बापटने IMDbच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत मिळवले स्थान!
अभिनेत्री सध्या तिच्या येणाऱ्या ‘इडली कढई’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच ती आगामी चित्रपट “डब्बा कार्टेल” आणि “बँडवाले” या चित्रपटामध्ये तिचे अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.