Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बॉर्डर 2 नंतर सिनेमागृहात पुन्हा एकदा धमाका करायला Sunny Deol सज्ज, नव्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

बॉलिवूड स्टार सनी देओलचा लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटा शूटिंग देखील सुरू झाल्याची माहिती मिळत आहे

  • By अमृता यादव
Updated On: Apr 06, 2026 | 06:27 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड स्टार सनी देओल त्याच्या दमदार ॲक्शन सीक्वेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे चित्रपट प्रदर्शित होताच चाहते चित्रपटगृहांकडे गर्दी करतात. आता, सनी देओलच्या ‘अँटनी’ या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ताज्या वृत्तानुसार, अभिनेत्याने चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. सनी देओल आणि त्याची टीम ‘अँटनी’च्या चित्रीकरणासाठी एका महिन्याकरिता गोव्याला जात आहे. असे वृत्त आहे की, या चित्रपटात अनेक ॲक्शन सीक्वेन्स असणार आहेत. या बातमीने सनी देओलचे चाहते उत्साहित झाले आहेत.

सनी देओलच्या चित्रपटाबद्दल मिड डेच्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी मार्चमध्ये ‘अँटनी’चे चित्रीकरण गुपचूप सुरू केले होते, जे आता पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक बालाजी गणेश यांनी आता गोव्यात महिनाभराच्या चित्रीकरणाचे नियोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिनाभराच्या चित्रीकरणादरम्यान सनी देओलचे अनेक ॲक्शन सीक्वेन्स चित्रित केले जातील. ‘अँटनी’मध्ये हा अभिनेता एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार असून, गोव्यातील गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या त्याच्या प्रयत्नांभोवती चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटातील सर्वात मोठे ॲक्शन सीन तिथेच चित्रित करण्याची योजना आहे. निर्माते धोकादायक स्टंट्सनी भरलेल्या रात्रीच्या चित्रीकरणाची योजना आखत आहेत, ज्यात सनी देओल स्वतः ॲक्शनचा महत्त्वपूर्ण भाग सादर करणार आहे.

आयुष्यातील मोठ्या टप्प्यांनंतर नात्यांमध्ये काय बदलते? अभिनेता उमेश कामत नात्यांच्या काळानुसार होणाऱ्या बदलांवर झाला व्यक्त !

सनी देओलच्या ‘अँटनी’ या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका हे कलाकारही आहेत. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक ए. आर. मुरुगादॉस करत आहेत. सनी देओलच्या ‘अँटनी’ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, सनी देओलचे ‘गबरू’, ‘लाहोर १९४७’, ‘रामायण’ आणि ‘बाप’ यांसारखे अनेक प्रभावी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सनी देओल शेवटचा ‘बॉर्डर २’ मध्ये दिसला होता, जो २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. ‘बॉर्डर २’ ला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

‘प्रेम सगळं काही नसतं’, Trisha Krishnan ची पोस्ट चर्चेत, Thalapathy Vijay सोबत अफेअरच्या अफवांदरम्यान पोस्ट व्हायरल

Web Title: After border 2 sunny deol is all set to create a storm in theatres once again a major update on his new film has surfaced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
1

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप
2

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
3

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष
4

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.