Shanthi Priya चे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, दिवंगत पतीच्या ब्लेझरमध्ये दिसला बॉसी लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडपासून ते दक्षिण चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारी अभिनेत्री शांती प्रिया हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शांती प्रिया 1991 मध्ये आलेल्या 'सौगंध' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्या विरुद्ध अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.
शांतीने टक्कल असलेल्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने तिच्या डोक्याचे मुंडन केले आहे.
यासोबतच अभिनेत्रीने तपकिरी रंगाचा ब्लेझर घातला आहे, जो तिला खूप चांगला सूट करत आहे. हा कोट तिच्या दिवंगत पतीचा आहे, जो तिने शूटिंग दरम्यान घातला होता.
शांतीप्रियाने तिच्या टक्कल पडलेल्या लूकचे फोटो पोस्ट केले आणि कॅप्शन लिहिले, "अलीकडेच मला टक्कल पडले आणि माझा अनुभव खूपच चांगला आहे. महिला म्हणून, आपण अनेकदा आयुष्यात मर्यादा घालतो, नियमांचे पालन करतो आणि स्वतःलाही पिंजऱ्यात बांधतो."
शांतीने पुढे लिहिले, 'या बदलामुळे मी स्वतःला मुक्त केले आहे, जगाने आपल्यावर लादलेले सौंदर्य मानक मी मोडण्याचा प्रयत्न केला आहे. मी ते खूप धैर्याने आणि माझ्या मनातील श्रद्धेने केले."
तिच्या पतीची आठवण काढत शांती म्हणाली, 'आज, मी माझ्या दिवंगत पतीची आठवण माझ्यासोबत जपली आहे, ती म्हणजे त्याचा ब्लेझर, जो अजूनही त्याची उबदारता जपतो आहे.' मी जगातील प्रत्येक स्त्रीला शक्ती आणि प्रेम पाठवते.' असं ती या कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.