
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सलमान खानचा रिॲलिटी शो “बिग बॉस १९” सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज ट्विस्ट आणि वळणे येत आहेत. घरातील सदस्यांच्या नात्यातही तफावत दिसून येत आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान खानने दिलेल्या फटकारानंतर, काही स्पर्धकांच्या खेळात सुधारणा दिसून येत आहे. घरातील कॅप्टन प्रणीत मोरेच्या वैद्यकीय आपत्कालीन एक्झिटनंतर, घरामध्ये पुन्हा एकदा कॅप्टनसी टास्क घेण्यात आला आणि घरातील सदस्यांना एक नवीन कॅप्टन मिळाला आहे. प्रणीत मोरेनंतर बिग बॉसच्या घराची सूत्रे कोणत्या सदस्याच्या हातात आली आहेत जाणून घेऊयात.
नवीन कॅप्टन कोण आहे?
बिग बॉसच्या फॅन पेज “बीबी तक” नुसार, अमाल मलिकने यावेळी कॅप्टनसी टास्क जिंकला आहे आणि तो घराचा नवीन कॅप्टन बनला आहे. अमालने यापूर्वी घरातील सत्ता सांभाळली आहे. आता, त्याने पुन्हा एकदा कॅप्टनसीची जबाबदारी स्वीकारली आहे. कॅप्टन झाल्यानंतर अमालचा खेळ किती प्रमाणात सुधारतो हे आगामी एपिसोड्समध्ये दिसून येणार आहे. अमालच्या नेतृत्वाखाली घरात कोणते नवीन प्रश्न उद्भवतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
कॅप्टनसी टास्कमध्ये झाला वाद
कॅप्टनसी टास्कबद्दल, घरात संगीत खुर्च्यांसारखेच एक टास्क होतो. या टास्क दरम्यान, संगीत थांबल्यानंतर स्पर्धकांना चौकोनी बॉक्समध्ये उभे राहावे लागत असे. जर दोन स्पर्धक एका बॉक्समध्ये एकत्र उभे राहिले तर दोघेही कॅप्टनसीच्या शर्यतीतून बाहेर पडतील. पहिल्या फेरीत तान्या मित्तल आणि शाहबाज बदेशा, दुसऱ्या फेरीत फरहाना भट्ट आणि मृदुल तिवारी, तिसऱ्या फेरीत नीलम गिरी आणि अभिषेक बजाज, चौथ्या फेरीत गौरव खन्ना आणि मालती चहर आणि पाचव्या फेरीत अशनूर कौर आणि कुनिका हे स्पर्धेतून बाहेर पडतात. अमाल मलिकने हा टास्क जिंकतो आणि तो पुन्हा एकदा घराचा कॅप्टन बनतो.
‘Ek Deewane Ki Deewaniyat’ ची क्रेझ अजून सुरुच; दुसऱ्या मंगळवारीही चित्रपटाची भरभरून कमाई
प्रणीत गेल्या आठवड्यात झाला होता कॅप्टन
प्रणीत मोरे गेल्या आठवड्यात कॅप्टनसी टास्क जिंकला. परंतु, प्रणीतला प्रकृती अस्वास्थ्यामुळे वीकेंड का वारमध्ये उपचारासाठी बिग बॉसच्या घराबाहेर पाठवण्यात आले. तसेच, वृत्तानुसार, प्रणीत मोरे लवकरच बरे झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल असे समजले आहे. तसेच आता बॉक्स ऑफिसचा खेळ आणखी रंगणार आहे. आता शो च्या फिनालेला देखील काहीच दिवस बाकी राहिले आहेत.