(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस’च्या घरात दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडणे होताना दिसत आहे . बिग बॉसचा तिसरा आठवडा वादांनी भरलेला दिसत आहे. या आठवड्यात कॅप्टन झालेल्या अमाल मलिकवर आधीच अनेक आरोप झाले होते. त्याच वेळी, घरात उपस्थित असलेल्या अनेक स्पर्धकांनी घरातील कामे करण्यास नकार दिला आहे. बिग बॉसच्या कॅप्टनची खुर्ची नेहमीच वादात राहिली आहे.
‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये कॅप्टनला त्याचे निर्णय आणि घराचे नियम अंमलात आणण्यात अडचणींना तोंड द्यावे लागते. याही सिजनमध्ये ‘बिग बॉस’ च्या घरातही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. अलिकडेच घराचा नवीन कॅप्टन बनलेला अमाल मलिक आणि प्रणीत मोरे यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणाचा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
कॅप्टन अमालची जोरदार भांडण
अमाल मलिक घराचा नवा कॅप्टन झाल्यापासून घरात काहीच ठीक चालले नाही आहे. घरातील लोक त्याच्या निर्णयांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या आठवड्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वयंपाकघरातील काम. अलिकडेच बिग बॉसचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये घरात जेवणावरून भांडण होताना दिसते आहे. त्यामुळे घरात तणाव वाढला आहे. बिग बॉसच्या एका प्रोमोमध्ये अमाल मलिक कुनिकासोबत भांडत असल्याचे दाखवण्यात आले होते, तर दुसऱ्या प्रोमोमध्ये अमाल आणि प्रणीत यांच्यात भांडण होताना आता दिसले आहे. अमाल सर्वांशी भांडताना दिसतो आहे.
“उद्या करेन असं म्हणून आईचा शेवटचा कॉलही उचलला नाही”, आईच्या आठवणीत किकू शारदा भावूक
उशिरा जेवण्यावरून सुरु झाला वाद
प्रोमोमध्ये आज जेवण उशिरा होणार का असे अमालने सर्वांना विचारताना दिसत आहे. आणि त्यानंतर या सगळं गोंधळ वाढला आहे. त्याने यासाठी लोकांचे मत मागितले, अमालच्या निर्णयात बहुतेक लोकांचा समावेश नव्हता. अमालने प्रत्येक स्पर्धकाला विचारले की आज जेवण उशिरा होणार आहे चालेल का? यावर प्रणीत मोरेने थेट अमाल सांगितले की तो उशिरा जेवेल पण बाकीच्या लोकांना विचारून घे. त्यानंतर अमाल त्याच्यावर रागवताना दिसला आहे. दोघांमधील वाद इतका वाढला की ते एकमेकांवर ओरडू लागले. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.