(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
OTT प्लॅटफॉर्मवरील चर्चित रिअॅलिटी शो ‘राइज अँड फॉल’ हा शो अशनीर ग्रोव्हर यांनी होस्ट केला आहे. सध्या हा शो विविध कारणांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या शोमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी, भांडणं आणि भावनिक क्षण सातत्याने पाहायला मिळत आहेत. मात्र, अलीकडेच रिलिज झालेल्या एका भागात प्रसिद्ध विनोदी कलाकार किकू शारदा याने त्याच्या आयुष्यातील एक अत्यंत दु:खद अनुभव शेअर केला आहे. यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक झालं होतं.
‘सगळं नशिबावर आहे…’ आदिनाथ कोठारेने नव्या मालिकेबद्दल शेअर केल्या भावना, साकारणार मुख्य भूमिका
शोदरम्यान किकू शारदा याने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी अवघ्या ४५ दिवसांत त्याने त्याच्या आई वडिलांना गमावलं. “ही माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक आणि धक्कादायक घटना होती, हे सर्व सांगताना त्याला रडू कोसळलं. तो पुढे म्हणाला, ”मी आईचा शेवटचा कॉल उचली शकलो नाही, उद्या कॉल करतो असं मनात म्हटलं कारण मी थोडा कामात होतो, पण दुसऱ्या दिवशी तीच नव्हती, या दु:खातून वडील सावरले नाहीत आणि ४५ दिवसांनी त्यांचंही निधन झाले.” यावेळी शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांनाही त्याच्या दु:खाची जाणीव झाली.
किकू शारदा याला त्याच्या विनोदी भूमिकांमुळे संपूर्ण देशभरात ओळखले जातं, मात्र सेटजवर त्याच्या आयुष्यात घडलेली भावनिक गोष्ट ऐकून प्रेक्षकांनाही त्या घटनेचं वाईट वाटले. या प्रसंगाचा सोशल मीडियावरही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी किकूला सहानुभूती दर्शवली आहे.
कोणत्या शोमुळे किकू शारदा घराघरात पोहोचला?
कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. त्याचे विनोदी टायमिंग, विविध भूमिका साकारण्याची कला आणि सहज अभिनयामुळे तो प्रेक्षकांचा लाडका ठरला. किकू शारदा याचा प्रवास हा प्रेरणादायी असून, त्याने मेहनतीने आणि चिकाटीने स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे