(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. इंदूरमध्ये जन्मलेल्या अंकिता लोखंडेचे खरे नाव तनुजा लोखंडे होते. तिने 2009 मध्ये पवित्र रिश्ता या शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये तिने अर्चना देशमुखची भूमिका साकारली होती. या शोमुळे तिचे घराघरात नाव झाले आणि ती लवकरच टेलिव्हिजनची मोठी स्टार बनली. चाहते तिला पसंत करू लागले.
या रिॲलिटी शोपासून सुरुवात केली
अंकिताची मेहनत आणि संघर्षाची कहाणी त्या मुलींसाठी प्रेरणा बनली आहे ज्या लहान शहरातून येतात आणि मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दाखवतात. मालिकांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने सिनेस्टार की खोज या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्रीच्या अभिनयामुळे त्यांना गोल्ड अवॉर्ड, आयटीए अवॉर्ड, इंडियन टेली अवॉर्ड असे मोठे सन्मान मिळाले आहेत.
Bigg Boss 18 : सारा अरफीन खानने पुन्हा एकदा रागाच्या भरात मारली कानशिलात
अभिनेत्रीने नंतर अनेक शो केले
टीव्ही शो व्यतिरिक्त अंकिताने झलक ‘दिखला जा’ आणि ‘कॉमेडी सर्कस का नया दौर’ यासह अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. अभिनेत्रीचे नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. यानंतर अंकिताने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि 2019 मध्ये मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात झलकारीबाईची भूमिका साकारली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.
‘बागी 3’ मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
2020 मध्ये, तिने बागी 3 चित्रपटात देखील अंकिताने मुख्य भूमिका साकारली आणि त्यानंतर 2021 मध्ये, पवित्र रिश्ता: इट्स नेव्हर टू लेटमध्ये अर्चनाच्या भूमिकेत ती पुन्हा दिसली. या सगळ्यामुळे तिचा अभिनय प्रवास आणखी घट्ट झाला. आणि चाहत्यांच मनोरंजन करत राहिली. चित्रपटांमध्ये अंकिता दिसली असली तरीही तिने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक रियालिटी शो केले आहेत आणि तिच्या करिअरची सुरूवातही रियालिटी शो ने झाली होती. या शो मुळेच तिला एकता कपूरच्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली
जागतिक स्तरावर पोहचलेल्या छाया कदमचा न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज…
अंकिताची यशोगाथा लहान शहरांतील मुलींना प्रेरित करते
अंकिता लोखंडेची यशोगाथा लहान शहरातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे. जिद्द ठेवली तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे त्यांनी आपल्या मेहनतीतून आणि समर्पणाने सिद्ध केले. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असून तिच्यावर चाहत्यांसह अनेक कलाकार शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. तसेच अभिनेत्रीने आणखी काय नवीन प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. लवकरच ती पुन्हा एकदा ‘लाफ्टर शेफ’ च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे