फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ फिनालेच्या दिशेने वेगाने जात आहे. या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी ८सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये आता नॉमिनेशनच्या नावांमध्ये आगामी भागामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे. मागील काही आठवड्यापासून घरातले सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.
बिग बॉस 18 मध्ये भांडण आणि त्याचबरोबर मारामारी वाढत आहे. आता शो जसजसा पुढे जात आहे तसतशी स्पर्धकांची आक्रमकताही वाढत आहे. काही शत्रू मित्र बनत आहेत तर काहींच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. अलीकडेच, टाइम गॉड टास्क शोमध्ये झाला ज्यामध्ये दिग्विजय राठी आणि रजत दलाल यांच्यात भांडण पाहायला मिळालं, तर सारा अरफीन खानने रागाच्या भरात स्वतःला कानशिलात मारली. तिने आदिन रोज आणि काशिशी कपूर यांच्याकडे तिची नाराजी व्यक्त केली आणि तिने रागामध्ये रजत दलाल, कशिश, एडिन आणि यामिनी यांच्यासमोर रडत असताना स्वतःच्या कानशिलात मारली आहे.
Bigg Boss 18 : नॉमिनेशनमध्ये होणार उलटफेर, नव्या टाइम गॉड करणार अदलाबदल
वास्तविक, टाइम गॉड टास्कच्या आधी रजत, यामिनी आणि सारा बोलतात जिथे सारा म्हणते की ती एडिन आणि कशिशवर रागावलेली आहे. ती म्हणते, चल घरचे काही काम करू नका, मी गप्प बसून आहे. एक गोष्ट सांगता येत नाही? ते मेकअप करण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी येथे आले आहेत. चाहत कशिशशी भांडत असताना त्याने तिला गटारातील मुलगी म्हटलं, बरोबर ना? मी तिथे होते, मी कोणाचाही अपमान केला नाही. यामिनी साराला पाठिंबा देते आणि म्हणते की ती बरोबर आहे कारण ती एडिन आणि कशिशला प्रत्येक परिस्थितीत साथ देते. पण जेव्हा साराला त्याची गरज होती तेव्हा तिने तिच्या मैत्रिणीची साथ दिली नाही.
जेव्हा सारा आणि एडिन टास्क संपवून बसलेले असतात, तेव्हा सारा रागाने विचारते की तिला त्याच्यासोबत काय समस्या आहे. यावर रजत साराला शांतपणे बोलण्यास सांगतो, ज्यावर सारा चिडते आणि ती स्वतःला कानशिलात मारते आणि म्हणते की मी इतकी वाईट आहे का? यानंतर ती तिथून निघून जाते. शोच्या गेमबद्दल बोलायचे तर सध्या श्रुतिका अर्जुन टाइम गॉड बनली आहे आणि त्यामुळे आता घरामधील अनेक नात्यांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता टाइम गॉड बनल्यामुळे घरात काय होते ते पाहूया.