(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा साखरपुडा नुकताच पार पडला असून, याचे खास फोटो तिने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये कपूर कुटुंबाचे अनेक भावनिक आणि प्रेमळ क्षण टिपले गेले आहेत. अंशुला कपूर आणि तिचा होणारा नवरा रोहन ठक्कर यांचा हा साखरपुडा “गोर धणा” या गुजराती परंपरेनुसार पार पडला. गोर धणा हा लग्नाआधीचा एक पारंपरिक समारंभ असून, तो साखरपुड्याशी मिळता-जुळता असतो.
Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
फोटोंमध्ये अंशुलासोबत तिचे वडील बोनी कपूर, भाऊ अर्जुन कपूर, आणि बहिणी जान्हवी कपूर व खुशी कपूर देखील उपस्थित असल्याचे दिसून येते. याशिवाय, शिखर पहाडिया देखील कुटुंबासोबत या सोहळ्यात सहभागी झाला होता.
अंशुला आणि रोहन यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुटुंबातील प्रेमळ वातावरण पाहून चाहत्यांनी या नव्या जोडप्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.अंशुला कपूरने रोहन ठक्करसोबतच्या तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आणि एक कॅप्शन लिहिले, “हा फक्त आपला गोर धना नव्हता, तर प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये व्यक्त होणारं प्रेम होतं. रोचं नेहमीचं आवडतं वाक्य आहे – ‘ऑलवेज अॅण्ड फॉरएव्हर’ – आणि आज, त्याला खराखुरा अर्थ मिळाल्यासारखं वाटलं”
अंशुला कपूरने शेअर केलेल्या हा फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या असून भरभरून प्रेम देत दोघांचे अभिनंदन केलं आहे.