
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संगीतकार ए.आर. रहमान इंडस्ट्रीतील जातीय भेदभावाबद्दल बोलल्यापासून गायक आता चांगलाच वादात सापडला आहे. गायकाच्या विधानावर अनेक सेलिब्रेटींनी टीका केली. परंतु, अनेक सेलिब्रिटींनी गायकाला पाठिंबा देखील दिला आणि म्हटले आहे की त्यांच्या विधानाचा गैरसमज झाला आहे. आणि आता याप्रकरणी, भजनवादक अनुप जलोटा यांनी रहमानच्या विधानावर कडक विधान केले आहे.
अनुप जलोटा काय म्हणाले?
गायक अनुप जलोटा यांचे म्हणणे आहे, रहमानच्या विचारांशी मी असहमत आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणाले, “रहमान मूळचा हिंदू होता. त्यानंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि खूप काम केले. त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. त्याने लोकांच्या हृदयात खूप चांगले स्थान निर्माण केले. पण जर त्याला असे वाटत असेल की तो मुस्लिम आहे आणि त्याला संगीत मिळत नाही म्हणून त्याला आपल्या देशात चित्रपट मिळत नाहीत, तर त्याने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्याला पुन्हा चित्रपट मिळू लागतील असा त्याने विश्वास ठेवला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे. म्हणून माझा त्याला सल्ला आहे की तो हिंदू धर्म स्वीकारावा आणि नंतर त्याला पुन्हा चित्रपट मिळू शकतात का ते पाहण्याचा प्रयत्न करावा.”
रहमान यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे, परंतु गोंधळ आणखी वाढत असल्याचे दिसून आले आहे. संगीतकाराने बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की गेल्या आठ वर्षांत त्यांना उद्योगात फारसे काम मिळालेले नाही. त्यांच्या मते,“गेल्या ८ वर्षांत या इंडस्ट्रीतली समीकरणं बदलली आहेत. आता अशा लोकांकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत जे स्वतः कलेशी जोडलेली नाहीत. कदाचित यामध्ये ‘कम्युनल’ अँगल असू शकतो, पण ते माझ्या तोंडावर कधीच आलं नाही.” आणि याच वक्तव्यामुळे गायक अडचणीत आला आहे.
वाद वाढत असल्याचे पाहून रहमान यांनी स्पष्ट केले की त्यांचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. भारत हे त्यांचे प्रेरणास्थान, गुरु आणि घर आहे. कधीकधी तुमचे हेतू गैसमजात बदलू शकतात. परंतु त्यांचा हेतू संगीत इंडस्ट्रीला दुखावण्याचा नव्हता असं येते ते म्हणाले आहे. भारतीय असल्याचा त्यांना सन्मान वाटतो. रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार होते. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. रहमान हे नाव त्यांना एका हिंदू ज्योतिषाने सुचवले. धर्मांतरानंतर त्यांचे पूर्ण नाव अल्लाह रखा रहमान झाले.