Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. गायकाने ‘सखे गं साजणी’ या आगामी चित्रपटासाठी टायटल ट्रॅक गायले असल्याचे वृत्त आहे, हे गाणं सध्या गाजत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 03:26 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा कमबॅक
  • ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक
  • अभिजीत सावंत गाण्यामुळे चर्चेत
 

भारतीय संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल तेरा वर्षांच्या कालावधीनंतर तो मराठी चित्रपटासाठी खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘सखे गं साजणी’ साठी अभिजीत सावंतने टायटल ट्रॅक गायला असून त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे.

संगीताच्या क्षेत्रात अभिजीत सावंतने आपल्या अनोख्या आवाजामुळे आणि हटके शैलीमुळे विशेष लोकप्रियता मिळवली आहे. इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिॲलिटी शोचा पहिला विजेता ठरल्यापासून त्याच्या संगीतप्रवासाला वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर हिंदी तसेच मराठी संगीतविश्वात त्याने अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली.

‘वाराणसी’ साठी ग्लोबल ब्रँड पार्टनरशिप; SKY BLUE सिनेमॅटिक्सकडे एक्सक्लूसिव राइट्स, 120 देशांमध्ये होणार रिलीज

आता 2025 वर्षात ट्रेंड सेटर गायक म्हणून ओळख निर्माण करून, अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या सुरेल आवाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. “सखे गं साजणी” या चित्रपटाचं टायटल ट्रॅक त्याने गायलं असून या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिजीत सावंतची एक झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गाण्यासोबतच त्याचा स्क्रीन प्रेझेन्सही चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

 

याआधी अभिजीत सावंतने गायलेले “सर सुखाची श्रावणी” हे गाणं प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्या गाण्यानंतर दीर्घ काळानंतर तो पुन्हा मराठी चित्रपटासाठी गात असल्याने संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच्या आवाजातील वेगळेपणा आणि भावपूर्ण शैली हीच त्याची खरी ओळख मानली जाते.

60 घरे, 100 टँकर पाणी; ‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’ गाण्यासाठी उभारला 2.5 एकरांचा भव्य सेट

“सखे गं साजणी” या चित्रपटातील टायटल ट्रॅक प्रेम, भावना आणि नात्यांच्या गोडव्याला सुरेल स्वरांत मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या गाण्यातून चित्रपटाची शैली आणि कथानकाची झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही या गाण्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. अभिजीत सावंतच्या पुनरागमनामुळे या गाण्याला आणि चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल का, याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. संगीतप्रेमी आणि चाहत्यांसाठी हे गाणं एक खास ट्रीट ठरणार आहे.

Web Title: Abhijeet sawant title track sakhe ga sajani marathi movie song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
1

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
3

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
4

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.