Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात

‘घबाडकुंड’ हा मराठी आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच या चित्रपटामध्ये ‘युनिव्हर्स’चा नवा प्रयोग पाहायला मिळणार आहे. तसेच हा चित्रपट येत्या १९ जूनला प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रहस्य, थरार आणि भव्य कथा
  • ‘घबाडकुंड’ चित्रपटातून ‘युनिव्हर्स’ची सुरुवात
  • ‘घबाडकुंड’ कधी होणार प्रदर्शित?
बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एन्ट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होणार आहे. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

निर्माते रसिक कदम यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या भरभरून यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील ‘घबाडकुंड’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. भय, थरार, रहस्य असा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ असणार आहे.

Kritika Gaurav Wedding: कृतिका कामरा आणि गौरवचं लग्नाचं अनोखं निमंत्रण; क्वर्की आफ्टर-पार्टी इन्व्हिटेशन व्हायरल

या चित्रपटाची कथा अनपेक्षित घटनांभोवती फिरते. काही जणांच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळतात, मात्र त्याच वेळी पडद्यामागे संशय, भीती आणि संकटांचा भयानक खेळ सुरू होतो. अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न निर्माण करते. सत्याच्या शोधात निघालेल्या व्यक्तींना कोणत्या परिस्थितींना सामोरे जावे लागते आणि शेवटी नशिब जिंकते की माणूस? याची उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे.

महिला दिनाचं औचित्य साधत ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा आणि चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरवचिन्हे आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यासोबत स्टायलिश आणि ग्लॅमरस फॅशन शोची शानदार झलक उपस्थितांनी अनुभवली. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे निर्माते रसिक कदम यांची ‘आयकॉन दी स्टाईल’ कंपनी आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी मनोरंजन क्षेत्रात जोरदार पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

याप्रसंगी निर्माते रसिक कदम म्हणाले, ‘घबाडकुंड’ हा एक वेगळा आणि रोमहर्षक अनुभव असणार आहे. उत्तम कथानक, दर्जेदार सादरीकरण आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या सगळ्यांचा उत्तम संगम या चित्रपटात पहायला मिळेल. १९ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार असून, त्यांना नक्कीच एक वेगळी आणि थरारक कथा पहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे.’

‘Dhurandhar 2’ च्या ट्रेलरनंतर आणखी एक सरप्राईज; रणवीर सिंगचा रिव्हेंज अवतार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

तसेच दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, ‘मराठीत ‘युनिव्हर्स’ चित्रपट करण्याचं स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न साकार होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. नव्या पिढीला अशी वेगळी आणि मोठ्या कॅनव्हासवरची संकल्पना खूप आवडते. त्यांच्या आवडीचा विचार करूनच हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.’

‘घबाड़कुंड’ चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. या चित्रपटाचे गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिनगारे आणि साउंड डिझाइन मानव श्रोत्रिय (एम पी एस सी) यांचे आहे. ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच साकारत असलेल्या या ‘युनिव्हर्स’मुळे हा चित्रपट जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Web Title: Ghabadkund movie will be the first marathi universe film gaurav more kushal badrike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज?  नेमका काय प्लॅन?
1

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज? नेमका काय प्लॅन?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं
3

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला
4

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.