Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anushka Birthday: अनुष्काने कधीच पहिले नाही अभिनेत्री होण्याचे स्वप्न, तरीही कशी झाली बॉलिवूडची टॉप हिरोईन? जाणून घ्या कारकीर्द!

अनुष्का शर्माने तिच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे २० चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये अशा भूमिका साकारल्या आहेत ज्या असामान्य होत्या. आज अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात कारकीर्द.

  • By सायली ससाणे
Updated On: May 01, 2025 | 10:29 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा १ मे २०२५ रोजी ३७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा भारतीय सैन्यात होते आणि आई आशिमा शर्मा गृहिणी आहे. अनुष्काचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला पण तिने देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. या अभिनेत्रीने बेंगळुरूमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ती एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी होती, त्यामुळे लहानपणापासूनच आत्मविश्वास तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला. अनुष्काला पत्रकार व्हायचे होते किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे होते पण नशिबाने तिला बॉलिवूडमध्ये आणले. अनुष्का शर्माच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात कशी झाली आणि करिअर व्यतिरिक्त, अनुष्काच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

मॉडेलिंगमध्ये अशी संधी मिळाली
अनुष्का शर्माने सुरुवातीला पत्रकार होण्याचा विचार केला होता पण नंतर ती मॉडेलिंगमध्ये सक्रिय झाली. एका मॉलमध्ये खरेदी करत असताना, एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरची अनुष्कावर नजर पडली आणि येथून तिच्यासाठी रॅम्पवर चालण्याचा मार्ग मोकळा झाला. अनुष्काने अल्पावधीतच मॉडेलिंगमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. या काळात ती अनेक जाहिरात चित्रपटांमध्येही दिसली. अनुष्काने कधीही अभिनय करण्याचा किंवा अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता.

‘वामा – लढाई सन्मानाची’ स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणार; मोशन पोस्टर रिलीज

यशराज नायिका म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात
मॉडेलिंगमुळेच अनुष्काला चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटासाठी यशराज कडून ऑफर मिळाली. जेव्हा अनुष्का या चित्रपटासाठी ऑडिशन देत होती, तेव्हा करण जोहरने आदित्य चोप्राला चित्रपटात नवीन मुलीला न घेण्याचा सल्ला दिला होता. काही वर्षांपूर्वी करण जोहरने स्वतः हे उघड केले होते. अनुष्काने अभिनेत्री म्हणून एक उत्तम करिअर घडवले आहे याचा तिला अभिमान आहे. अनुष्का शर्माने यशराजसोबत एक नाही तर अनेक चित्रपट केले. यामध्ये ‘बँड बाजा बारात’, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’, ‘बदमाश कंपनी’, ‘जब तक है जान’ यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

तिन्ही खान सोबत केले अभिनेत्रीने काम
तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनुष्का शर्माने आमिर खानसोबत ‘पीके’, शाहरुख खानसोबत ‘जब तक है जान’, ‘झिरो’ असे चित्रपट केले आहेत. तिने सलमान खानसोबत ‘सुल्तान’ चित्रपटही केला. अशाप्रकारे, अनुष्का शर्मा त्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली ज्यांनी मोठ्या पडद्यावर तिन्ही खानसोबत काम केले आहे.

अभिजित सावंत म्हणतोय, ‘तुझी चाल तुरूतुरू’, तरूणाईसाठी नव्या ढंगात होणार पेश

निर्माता म्हणून महिला केंद्रित चित्रपट बनवले
अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, अनुष्का शर्माने निर्माती म्हणूनही एक नवीन इनिंग सुरू केली आहे. ‘एनएच १०’ सारख्या चित्रपटात तिने एक वेगळी भूमिका साकारली आणि या चित्रपटाची निर्मितीही केली. आतापर्यंत अनुष्का शर्माने निर्माती म्हणून ‘बुलबुल’, ‘फिल्लौरी’ आणि ‘परी’ सारखे चित्रपटही बनवले आहेत. अनुष्काने निर्मित केलेले सर्व चित्रपट महिलांवर आधारित होते. या कथांमध्ये सामान्य महिलांचे दुःख आणि वेदना वर्णन केल्या गेल्या. तसेच एक अभिनेत्री म्हणून, अनुष्का शर्माने ज्या चित्रपटांमध्ये नायकाच्या बरोबरीच्या भूमिका केल्या आहेत, त्या चित्रपटात अनुष्काच्या व्यक्तिरेखेला नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे.

अनुष्का शर्माची एकूण संपत्ती
अनुष्का शर्माने तिच्या चित्रपट कारकिर्दीत चांगली कमाई केली आहे. २०१८ मध्ये, अभिनेत्रीचे नाव फोर्ब्स मासिकात (बिझनेस मॅगझिन) आले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, अनुष्काची एकूण संपत्ती २५५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. अनुष्का हे उत्पन्न चित्रपटांमध्ये काम करून, तिच्या निर्मिती कंपनीकडून आणि जाहिरात चित्रपटांमध्ये काम करून मिळवते.

Web Title: Anushka sharma birthday actress career and personal life facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
2

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
3

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
4

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.