Abhijeet Sawant Create New Version Of Old Song Chaal Turu Turu
तरुणाईला सुमधुर आवाजने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजे अभिजीत सावंत ! फक्त संगीताची जादू नाही तर त्याने बिग बॉस सारख्या रियालिटी शो मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं बिग बॉस नंतर अभिजीत काय नवीन काम करणार कोणतं गाणं चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि अश्यातच आजच्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत एक खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलाय.
“मी बेकार मुलगी, कुठलंही काम करु शकत नाही…” आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला…
” चाल तुरु तुरु ” या जुन्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीत करणार आहे. येत्या २ मे २०२५ रोजी हे खास गाणं रिलीज होणार असून मूळ गाण्याचं काहीतरी हटके ट्वीस्ट असलेलं हे नवं गाणं असल्याचं कळतंय.
आजवर अभिजीतने त्याचा आवाजाची जादू दाखवून अनेकदा गाण्याची पर्वणी प्रेक्षकांना दिली आहे आता हे नवं गाणं बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी देखील चाहते तितकेच उत्सुक आहेत यात शंका नाही.
‘अशी ही जमवा जमवी’ ची भव्य संध्याकाळ; अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
२०२५ वर्ष अभिजीत सावंत साठी अजून एका कारणाने खास असून संगीत विश्वातील अभिजीतच हे २० वर्ष आहे ! आणि या निमित्ताने अभिजीत ने ” चाल तुरु तुरु ” गाणं प्रेक्षकांना भेट दिलं अस म्हणणं वावग ठरणार नाही. प्रेक्षक कायम अभिजीत च्या नवनवीन कलाकृतीची वाट बघत असतात आणि अश्यातच हे नवं गाणं प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे.
तरुणाईचा लाडका गायक असलेला अभिजीत कायम वेगवेगळ्या गाण्याची पर्वणी त्याचा चाहत्यांना देत आला आहे आता हे गाणं प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतंय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.