Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Vekaria Death News : गुजराती रंगमंचावरील सितारा हरपला! तारक मेहता का उलटा चष्मा फेम बागावर कोसळला दुःखाचा डोंगर

गुजराती अभिनेते अरविंद वेकारिया यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम तन्मय वेकारिया यांच्यासाठी हा मोठा वैयक्तिक धक्का ठरला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचेही निधन झाल्याने कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2026 | 04:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

गुजराती रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरविंद वेकारिया यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बाघा ही लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेता तन्मय वेकारिया हे त्यांचे सुपुत्र आहेत. काही महिन्यांपूर्वीच तन्मय यांच्या आईचे निधन झाले होते. अशात आता वडिलांचेही निधन झाल्याने वेकारिया कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या बातमीनंतर चाहते आणि कलाविश्वातील अनेक मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

Nikhil Anushka Wedding : वधू-वराची वारी, मांडवाच्या दारी! अनुष्का सरकटे – निखिल चव्हाणच्या लग्नातला मराठमोळा अंदाज Viral

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तन्मय वेकारिया यांचा एक भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते वडिलांच्या प्रकृतीबद्दल बोलताना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. त्यावेळी मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी त्यांना धीर देत सावरण्याचा प्रयत्न केला होता. या प्रसंगाने अनेक चाहत्यांनाही भावूक केले होते.

अरविंद वेकारिया यांनी गुजराती नाट्यसृष्टीत अनेक वर्षे उल्लेखनीय योगदान दिले. रंगभूमीबरोबरच त्यांनी गुजराती चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘यशोदा’, ‘छानू चमकलो’ आणि ‘रुपियो नाच नचावे’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. याशिवाय त्यांनी लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका ‘शक्तिमान’मध्येही काम केले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतही अरविंद वेकारिया यांनी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत हजेरी लावली होती. कथानकात आत्माराम भिडे पत्नी माधवीचे दागिने गहाण ठेवण्यासाठी ज्या ज्वेलरकडे जातात, त्या ज्वेलरची भूमिका त्यांनी साकारली होती. पडद्यावर त्यांचा वावर मर्यादित असला तरी त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली होती.

समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत; अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर पोस्टरचे भव्य अनावरण

दरम्यान, सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बाघा आणि बावरी यांच्या नात्याभोवती कथानक रंगताना दिसत आहे. बावरीच्या आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे या प्रेमकहाणीत गुंतागुंत निर्माण झाल्याचे मालिकेत दाखवले जात आहे. अशा वेळी तन्मय वेकारिया यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या या दुःखद घटनेमुळे चाहते हळहळ व्यक्त करत असून, त्यांच्या आणि संपूर्ण वेकारिया कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश देत आहेत.

Web Title: Arvind vekaria the father of bagha from tarak mehta ka oolta chashma died death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Actor
  • Death

संबंधित बातम्या

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
2

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.