Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बागलाण तालुक्यातील नामपूर-द्याणे दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2026 | 12:07 PM
विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Follow Us
Follow Us:

सटाण : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बागलाण तालुक्यातील नामपूर-द्याणे दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे. गणेशोत्सवाच्या आनंदावर या दुर्घटनेने विरजण पडले असून, नामपूरसह मोसम खोऱ्यावर शोककळा पसरली आहे. गणपती विसर्जनाच्या उत्साहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

नामपूर येथील एका खासगी शिकवणीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी संबंधित शिक्षक आणि विद्यार्थी द्याणे शिवारातील बंधाऱ्यावर गेले होते. विसर्जनाच्या वेळी नामपूर येथील ऋतिक दादाजी वाघ (वय १७) आणि उत्राणे येथील अथर्व दीपक पगार (वय १७) हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ बंधाऱ्यात शोध सुरू केला. अथर्व पगार याचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. ऋतिक वाघ हा वाळूत रुतल्याने त्याचा शोध घेण्यासाठी मालेगाव येथून पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने ऋतिकचा शोध घेण्यात आला.

दोन्ही विद्यार्थी अवघ्या १७ वर्षांचे असल्याने या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच बंधाऱ्यावर नागरिक, तरुण आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. गणपती विसर्जनाच्या उत्साहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सातारा जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण

पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात

पाटस-दौंड अष्टविनायक रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाटस येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम यांनी दिली. शुभम मिनानाथ शितोळे (वय २५  रा. पाटस, देशमुखवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, गजानन आत्माराम इंगळे (, रा. पारंबी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हा दुचाकी चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याचावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ही घटना शुक्रवार, दिनांक ११ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास पाटस-दौंड रोडवरील जुन्या इरिगेशन कॉलनीजवळील धोकादायक वळणावर घडली आहे.

Web Title: In a shocking incident two school students drowned during the ganpati immersion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Death
  • ganesh utsav
  • maharashtra

संबंधित बातम्या

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
1

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
2

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
3

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
4

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.