Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baaghi 4: टायगर श्रॉफच्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री, कोणते सीन केले कट ?

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफचा 'बागी ४' हा चित्रपट सेन्सॉर करण्यात आला आहे. चित्रपटामधील २३ दृश्य कट करण्यात आले आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 04, 2025 | 05:41 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ वर सेन्सॉर बोर्डाची कात्री
  • चित्रपटामधील अनेक दृश्य केली कट
  • ‘बागी ४’ कधी होणार प्रदर्शित?
बॉलीवूडच्या सुपरहिट फ्रँचायझी मधील ‘बागी’ चित्रपट देखील एक आहे. या चित्रपटाचा आता नुकताच चौथा भाग प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांचा ‘बागी ४’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु त्याच्या प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने अनेक सीन कट केले आहेत. आणि सेन्सॉर बोर्डाने कोणते दृश्य कट केले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

‘तुझा अहंकार तुझ्याकडेच ठेव…’, आई-मुलीच्या नात्यात दुरावा; तान्या मित्तलला असं का म्हणाली कुनिका?

‘बागी ४’ वर सेन्सॉर बोर्डाची कात्री लागली
बॉलीवूड हंगामातील एका वृत्तानुसार, साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे, परंतु हिंसाचाराशी संबंधित अनेक दृश्ये बोर्डाच्या नजरेतून सुटली नाहीत. परिणामी चित्रपटात २३ कट करण्यात आले. यामध्ये धार्मिक भावना दुखावणारे दृश्ये, आक्षेपार्ह संवाद आणि रक्तपाताशी संबंधित अनेक दृश्ये समाविष्ट आहेत. या कात्रीमुळे चित्रपट आता २ तास ४३ मिनिटांवरून २ तास ३७ मिनिटांवर आला आहे.

वादग्रस्त सीन केले कट
चित्रपटात असे अनेक दृश्य होते जे पूर्णपणे काढून टाकावे लागले. उदाहरणार्थ, टायगर श्रॉफ शवपेटीवर उभा राहणे, येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावर हल्ला करणे आणि मानवी कवटीत तलवार घालणे यासारख्या दृश्यांचा समावेश होता. याशिवाय, मानवी गळे कापण्याचे आणि हात कापण्याचे रक्ताने माखलेले दृश्य देखील सेन्सॉर बोर्डाने मान्य केले नाहीत. इतकेच नाही तर एक नग्न दृश्य आणि अश्लील हावभाव असलेले शॉट देखील काढून टाकण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने संवादांवरही कडक भूमिका घेतली. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार अनेक शिवीगाळ आणि आक्षेपार्ह शब्द देखील बदलण्यात आले आहे.

Zee Marathi Awards 2025: बाप्पाच्या चरणी, ढोल- ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ!

निर्मात्यांनीही कट केले दृश्य
विशेष म्हणजे, चित्रपट अधिक चांगला बनवण्यासाठी निर्माते स्वतःही पुढे आले. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मर्जीने काही दृश्ये काढून टाकली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वॉर २’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ मध्येही हाच ट्रेंड दिसून आला होता. म्हणजेच आता मोठे बॅनर स्वतः चित्रपटाचे कट आणि ट्रिमिंग करण्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत. ‘बागी ४’ चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एकदा ‘रॉनी’च्या भूमिकेत दिसणार आहे, तर संजय दत्त नकारात्मक भूमिका साकारत आहे. याशिवाय हरनाज संधू, श्रेयस तळपदे, सौरभ सचदेवा, उपेंद्र लिमये आणि सोनम बाजवा हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Web Title: Baaghi 4 censor board 23 cuts removed adult certificate tiger shroff sanjay dutt action thriller release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sanjay Dutt
  • tiger shroff

संबंधित बातम्या

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान Jay Bhanushali दिसला मिस्ट्री गर्लसोबत; अभिनेत्रीने उघड केलं सत्य
1

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान Jay Bhanushali दिसला मिस्ट्री गर्लसोबत; अभिनेत्रीने उघड केलं सत्य

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा टीझर करतोय धमाल! ‘या’ दिग्गज अभिनेत्री झळकणार एकत्र
2

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा टीझर करतोय धमाल! ‘या’ दिग्गज अभिनेत्री झळकणार एकत्र

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation
3

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले
4

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.