Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार आठवड्यांत २४ कोटींचा टप्पा पार; ‘क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम’ची खास ‘मराठी शाळा योजना’

मराठी चित्रपट सध्या जास्त चर्चेत आहेत, आणि अशातच आता ‘क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम’ चित्रपटाने २४ कोटींचा टप्पा पार केला आहे. आणि त्याने आता मराठी शाळांसाठी नवीन योजना सुरु केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 02, 2026 | 08:40 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • चार आठवड्यांत २४ कोटींचा टप्पा पार
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम’ची नवी योजना
  • मराठी शाळांच्या भावविश्वाला भिडणारा चित्रपट
 

मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत अवघ्या चार आठवड्यांत या चित्रपटाने २४.०३ कोटींची कमाई केली आहे. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला असून, अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोजसह सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. या यशानंतर आता चलचित्र मंडळीने मराठी शाळांना समर्पित ‘मराठी शाळा योजना’ हा खास उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सवलतीच्या दरात विशेष शो आयोजित करण्यात येत आहेत.

Pavitra Puniaवर कोसळला दुःखाचा डोंगर, वैयक्तिक कारणांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली

शाळांतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मराठी माध्यमाची ओळख-संस्कृती आणि शाळेसोबत असलेलं भावनिक नातं अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने हे शो आयोजित केले जात आहेत. मराठी शाळांसाठी हा चित्रपट एक भावनिक आणि सामाजिक अनुभव ठरत आहे. ‘मराठी शाळा योजना’ ही योजना आपल्या शाळांसाठी आयोजित करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि माजी विद्यार्थी पुढाकार घेत आहेत. सवलतीच्या तिकिटांमुळे अधिकाधिक मराठी शाळांना हा चित्रपट पाहाण्याची संधी मिळत आहे.

 

याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “ प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मात्र, त्याहूनही मोठं समाधान म्हणजे मराठी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक स्वतःला या चित्रपटात पाहात आहेत. त्यांना हा चित्रपट आपलासा वाटत आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपट मराठी शाळा, मराठी भाषेचे महत्त्व सांगतो. तो जास्तीत जास्त मराठी शाळांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तो अनुभवावा, यासाठीच चलचित्र मंडळीच्या वतीने ‘मराठी शाळा योजना’ ही सवलतदर देणारी सुरू करण्यात आली आहे.”

कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्मात्या आहेत. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Web Title: Krantijyoti vidyalaya marathi madhyam launches marathi shala yojana after 24 crore collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.