Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शतक’ चित्रपटातून RSS च्या शताब्दीचा गौरव; चित्रपटाबद्दल बाबा रामदेव यांचा भावपूर्ण संदेश

‘शतक – आरएसएस के १०० वर्ष ’ हा आगामी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट आरएसएसची न उलगडलेली कहाणी आणि राजकीय जडणघडणीतले योगदान उलगडण्याचा प्रयत्न करतात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 02, 2026 | 10:23 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘शतक’ चित्रपटातून RSS च्या शताब्दीचा गौरव
  • चित्रपटाबद्दल बाबा रामदेव यांचा भावपूर्ण संदेश
  • ‘शतक’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

योगगुरू आणि पतंजली समूहाचे संस्थापक बाबा रामदेव हे दीर्घकाळापासून राष्ट्र, संस्कृती आणि आत्मनिर्भर भारत या विचारांचे ठाम प्रवक्ते आहेत. त्यांनी वारंवार उच्चारलेली ओळ “आम्ही मिटलो तरी चालेल, आम्ही राहिलो नाही तरी चालेल; पण हे मातृभूमी, तुझे वैभव अमर राहो” आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त तयार झालेल्या ‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटाच्या भावनेशी अतिशय सुसंगत ठरते.

RSSन च्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून तयार करण्यात आलेला हा चित्रपट संघाची शंभर वर्षांची वैचारिक वाटचाल, सामाजिक योगदान आणि राष्ट्राप्रती असलेले समर्पण प्रभावीपणे अधोरेखित करतो. बाबा रामदेव ज्या राष्ट्रभान, सांस्कृतिक आत्मगौरव आणि सेवा-भावनेचा सातत्याने उल्लेख करतात, तीच चेतना ‘शतक’ या चित्रपटातून सिनेमाच्या माध्यमातून सशक्तपणे मांडण्यात आली आहे.

चार आठवड्यांत २४ कोटींचा टप्पा पार; ‘क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम’ची खास ‘मराठी शाळा योजना’

नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीझरमधून असे दिसून येते की, संघाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या गैरसमज, टीका आणि संभ्रम यांना तथ्ये आणि ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते आणीबाणीसारख्या निर्णायक कालखंडापर्यंत RSSची भूमिका चित्रपटात ठळकपणे दाखवण्यात आली आहे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आनंद व्यक्त करताना बाबा रामदेव म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने संघाची विचारधारा, त्याचे योगदान, दृष्टी आणि हिंदू समाजाची एकता तसेच राष्ट्राच्या अखंडतेसाठी संघाने केलेला संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे. युगानुयुगे चालत आलेली आपली प्राचीन सनातन संस्कृती, ऋषीपरंपरा तसेच वीर-वीरांगनांची गौरवशाली परंपरा जपत भारताला आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महासत्ता बनवण्याच्या संकल्पनेत संघाचे योगदान ऐतिहासिक आहे.”

Grammy 2026: दलाई लामा यांनी जिंकला पहिला ग्रॅमी पुरस्कार, के-पॉप डेमन हंटर्सनेहा रचला इतिहास

‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटाबाबत आपला संदेश देताना ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी म्हणजे केवळ एक कालखंड नाही, तर सेवा, संस्कार आणि राष्ट्रसमर्पणाच्या शंभर वर्षांची तपश्चर्या आहे. हाच भाव सशक्तपणे मांडणाऱ्या ‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटासाठी संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. हा चित्रपट सनातन संस्कृती, ऋषीपरंपरा आणि राष्ट्राच्या अखंड चेतनेला सोप्या व प्रभावी पद्धतीने जन-जनापर्यंत पोहोचवेल. संघाची विचारधारा कोणत्याही एका संघटनेपुरती मर्यादित नसून ती राष्ट्रभानाची विचारधारा आहे. ‘शतक’ हा चित्रपट कोट्यवधी पूर्वजांच्या त्यागाला आणि लाखो स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ सेवेला आदरांजली आहे.’

“आम्ही मिटलो तरी चालेल, आम्ही राहिलो नाही तरी चालेल; पण हे मातृभूमी, तुझे वैभव अमर राहो’ — या संकल्पनेची जाणीव समाजात जागृत व्हावी आणि भारताला विश्वगुरू बनवण्याच्या प्रवासाला हा चित्रपट नवी प्रेरणा देवो, हीच माझी शुभेच्छा आहे.” राष्ट्रनिर्माण आणि देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणारा ‘शतक : संघाची १०० वर्षे’ हा चित्रपट येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे

Web Title: Rss centenary marathi movie shatak baba ramdev message about 100 years of rss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.