(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू…,’ दिलजीतने पुन्हा एकदा पंजाबसाठी पुढे केला मदतीचा हात
कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ही केवळ स्पर्धा नसून, प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील प्रेमाचं एक सुंदर प्रतिबिंब असल्याचं त्यांनी नमूद केले आहे. मतदानाची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर मत पत्रिकेद्वारे पार पडणार आहे त्यासोबतच झी ५ अॅपवर ही प्रेक्षक मतदान करू शकणार आहेत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकार, मालिकेला ज्यांनी त्यांचं मन जिंकलंय, त्यांना विजयी करण्याची संधी मिळवून देणार आहे.
‘तुझा अहंकार तुझ्याकडेच ठेव…’, आई-मुलीच्या नात्यात दुरावा; तान्या मित्तलला असं का म्हणाली कुनिका?
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा केवळ एक अवॉर्ड शो नसून महाराष्ट्रातील संस्कृती, कुटुंबातील नाती आणि प्रेक्षकांच्या भावनांचा एक भव्य उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या मतांनी घडवा तुमच्या लाडक्या कलाकारांचा सन्मान. तसेच हा सोहळा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीने अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाला आहे. आता ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ या मोठ्या कार्यक्रमात कोणती मालिका विजयी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






